सावध रहा, काळजी घ्या
राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या देशात आणि राज्यात संचारबंदी सुरू आहे. जनतेत भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. त्याच बरोबर राज्यातील जनतेने सावध राहाणे गरजेचे आहे.सध्य स्थितीला कोरोनाबाधित रुग्णांची १२२ पोहचली आहे.
सोमवारपर्यंत राज्यात महाराष्ट्रातील करोना बाधित रूग्णांच्या संख्येचा आकडा ९७ वर होता. मंगळवारी संध्याकाळपर्यंत हा १०७ वर पोहचला. आता सध्य स्थितीत हा आकडा पुढेपुढे सरकत आहे.नवे नवे रुग्ण आढळत असल्यामुळे आता हा वाढून १२२ वर पोहचला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण होत आहे. आता जनतेने सावध होणे गरजेचे आहे या महामारीला रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन केले पाहिजे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते . स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या आणि घरीच थांबा हीच विनंती सरकार वारंवार करत आहे . आम्हीही आपणास हीच विनंती करत आहोत रस्त्यावर फिरणे शक्यतो टाळा घरीच कुटुंबासोबत आनंद घ्या परिस्थितीची जाण ठेवा.
वाढत चाललेली रुग्णांची संख्या ही सध्या चिंता वाढवणारीच ही बातमी आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोरोना बाधित किती ? याची खास तुमच्यासाठी माहिती घ्या जाणून.
आकडेवारी खालीलप्रमाणे:
मुंबई शहर आणि उपनगर - 51
पिंपरी चिंचवड मनपा - 12
पुणे मनपा - 19
नवी मुंबई - 5
कल्याण - 5
नागपूर - 4
यवतमाळ - 4
सांगली - 9
अहमदनगर - 3
ठाणे - 3
सातारा - 2
पनवेल- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी - 1
वसई-विरार - 1