पवईत घरकामगार महिलांची निदर्शने

*पवईत घरकामगार महिलांची निदर्शने*



मुंबई : मुंबईत घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या अनेक महिलांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या साथीने या गरीब समुदयातल्या कुटुंबावर अक्षरशः उपाशीपोटी राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे मार्च महिन्यात देशात मोदीसरकार च्या मनमर्जी लॉकडाऊनमुळे देशातील घरकाम करणाऱ्या महिलांच्या हातांचे काम गेले आणि अर्धपोटी दिवस काढावे लागत आहेत सात महिने पूर्ण होत आहेत पण अद्यापही त्यांना पोटभर पोटाला घास मिळेनासे झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे जिवन हलाखीचे बनले आहे. मुंबई दिल्ली कलकत्ता सारखे महानगरे आणि त्यात घरकाम करणाऱ्या महिलांची आजची दैनिय अवस्था पाहता सरकारने त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्याच्या आड कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत कोट्यवधी लोक बेरोजगार झाले महागाई गगनाला भिडली आहे. अशा परिस्थितीत जगायचं कसं हा प्रश्न समोर उभा आहे. त्यात आर्थिक चणचण निर्माण झाल्याने घरकामगार महिलांना आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी घरकाम मिळेनासे झाले आहेत त्यामुळे जगावं की मरावं हा प्रश्न समोर उभा आहे.


 


कोरोना मुळे घरकामगार महिलांच्या कुटुंबाच्या तोंडातला घास या लॉकडाऊनमुळे हिरावून घेतला आहे. त्यात मुलांचे शिक्षण घेण्यासाठी व दवाखाना, औषधोपचार करण्यासाठी देखील पैसे नाहीत. हातातला रोजगार गेल्याने घरकामगार महिलांचे अतोनात हाल होत आहेत.


 


एकीकडे कोरोना महामारीमुळे हताश झालेला नागरिक आणि त्यात हातचा रोजगार गेल्याने हताश झालेल्या घरकामगार महिलांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी केंद्र सरकार विरोधात पवई (दि.२४)निदर्शने करण्यात आले.


 


या निदर्शनात घरकामगार महिलांनी आपल्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन केंद्र सरकार या मूक निदर्शनाच्या मार्फत केले आहे. घरेलू कामगारांचा राष्ट्रीय मंच आणि महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्या तर्फे हे निदर्शन पवई करण्यात आले.


 


यापूर्वी देखील लॉकडाऊन मध्ये देखील पवईतील घरकामगार महिलांचे सगळ्या प्रकारे रोजगार बंद असताना पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियने पुढाकार घेत अन्नधान्याचे किट देखील पुरवण्यात आले होते.


 


लॉकडाऊन उघडून अनलॉक सुरु झाला असताना देखील घरकामगार महिलांना "मॅडम कामावर येऊ का?" अशीच हाक देत आहेत पण कोरोनाची जनमानसात एवढी मोठी भीती निर्माण झाली आहे की महिलांना कोणी आपल्या घरी कामाला बोलवायला तयार होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. परस्थितीने पुर्णतः हताश झालेल्या महिलांनी विविध मागण्या घेऊन हे राज्य राष्ट्रीय मुक निदर्शन करण्यात आले


 


*ह्या मागण्या घेऊन केले निदर्शन*


 


१) घरेलू कामगारांसाठी समाजसेवक कायद्याची बांधणी करा.


२) घरेलू कामगारांसाठी सर्व प्राथमिकतेने काम नाकारल्याची आर्थिक नुकसान भरपाई त्यांच्या बँक खात्यात जमा करा.


३) आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अमंलबजावणी करण्यात यावी.


४) शहरी रोजगार हमी योजना लागू करा.


 


अशा मागण्या घेऊन हे निदर्शने शांतपणे सोशल डिस्टंसिंग पाळत संपूर्ण सुरक्षितपणे या निदर्शने करण्यात आले आहेत या समुदायकडे सरकार देईल काय यांची मूक आरोळी सरकारच्या कानावर पडेल काय हा प्रश्न मात्र सध्यातरी अनुत्तरीत राहिला आहे.