नशेच्या अमली पदार्थांसह नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी केले अटक

 नशेच्या अमली पदार्थांसह नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी केले अटक

मीरा रोड : मिरा-भाईंदर शहरात नशेच्या पदार्थांची विक्री चोरीच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातला तरुण युवक युवती नशेच्या आहारी जातांना दिसत आहे. शहर नशेच्या पदार्थांचे माहेरघर बनत चालले आहे. प्रतिबंधित असलेला नशेच्या पदार्थांचा साठा शहरात वारंवार मिळून येऊ लागला आहे. शहरात गुप्तपणे काम करणारी पोलीस यंत्रनेला थांगपत्ता न लागू देता हा व्यवसाय शहरातील झोपडपट्टी असो या चांगल्या चांगल्या इमारतीमध्ये चोरीछुप्या मार्गाने सुरू आहे असे चित्र पहावयास मिळून येऊ लागले आहे. नुकतेच  मीरारोडच्या शीतल नगरमधील एका सदनिकेतून पोलिसांनी तीन नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थांसह गुरुवारी रंगेहात अटक केली आहे. त्यांच्याकडे कोकेन व मद्याचा साठा आढळून आला असून पोलिसांनी तो जप्त केला आहे.


परदेशी नागरिक या धंद्यात मोठ्याप्रमाणात काम करत आहेत अशीच काहीशी परिस्थिती दिसू लागली आहे. शीतल नगर येथील शीतल साई इमारतीत नायजेरियन नागरिक अमली पदार्थ विक्री करीत असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे हवालदार प्रदीप टक्के यांना मिळाली होती.  त्यानुसार अमली पदार्थ विरोधी शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, सहायक निरीक्षक विलास कुटे तसेच टक्के, इंगळे, आव्हाड, घरबुडे तर मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चव्हाण, उपनिरीक्षक तानाजी सावंत, गायकवाड, पाटील, खरमाटे, शिंदे, कवाणी व कात्यायनी यांच्या पथकाने सदर ठिकाणी सदनिकेवर छापा टाकला. त्यावेळी सदनिकेत असलेल्या जॉन केनेथ ओकोलुजी (४९), ईझे टोनी (४२) (रा. हटकेश) व फ्रंक नवाफोर (३४) या तिघा नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. जॉन याने शौचालयात लपवलेले एक लाख ६८ हजार किमतीचे १४ ग्रॅम कोकेन तसेच घरातील १५ हजारांचे विनापरवाना मद्य पोलिसांनी जप्त केले. नावाफोरकडे भारतात वास्तव्य करण्यासाठीचा परवानाही नसल्याचे आढळून आले. या मुळे  शहराची सुरक्षा धोक्यात जातआहे की काय असा प्रश्न पडू लागला आहे. परदेशी नागरिक जर विना वास्तव्याचा परवानगी विनाशहरात राहत असतील आणि या लोकांकडून शहरात देशविरोधी कारवायाना चालना मिळाल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्न सुज्ञ नागरिक विचारू लागले आहेत. पोलिसां समोर  परदेशी नागरिकांचे व वास्तव्य परवाना नसलेल्या पण शहरात वास्तव्य करत असलेल्या नागरिकामुळे त्यांना शोधून कारवाई करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.