मनाई आदेश मोडून बियर व वाईन विकणारा गेला गजाआड

मनाई आदेश मोडून बियर व वाईन विकणारा गेला गजाआड


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आस्थापना बंद करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने सरकार एकीकडे पावले उचलत आहेत, तर दुसरीकडे जिल्हाधिकार्याचे आदेश धुडकावत चोरीच्या मार्गाने बियर व वाइन विकण्याचे प्रकार शहरात सुरू असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळताच पोलिसांनी तात्काळ पावले उचलत बिअर विक्री करणाऱ्या इसमाला गजाआड केले आहे.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळीकडे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारचे हॉटेल, बियरबार आणि सार्वजनिक ठिकाणं देखील पूर्णपणे बंद करण्यात आली असून कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री करण्यास देखील मनाई करण्यात आलेली आहे. याच संचारबंदीचा फायदा घेतहाटकेश परिसरात बियर च्या दुकानदाराने  चोरीचा मार्गातून  बियर विक्री कण्याचा  सपाटा लावला होता  त्याची खबर खबऱ्यांनी पोलिसांना दिली तेंव्हा पोलीस  चक्रावले  आणि त्या घटनेची शहानिशा केली हा प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच सापळा रचून बियर च्या दुकानावर छापा टाकून  लाखो रुपयाचा बियर आणि वाईन चा माल  हस्तगत केला व आरोपीला गजाआड केले.


मिरारोड मधील हाटकेश विभागातील  जीसीसी क्लब जवळ असलेल्या गौरव गॅलेक्सी, बिल्डींग नंबर ४, येथे " सिंग बियर शॉप" या दुकानाचा मॅनेजर  चोरीच्या छुप्या पद्धतीने दुप्पट ते तिप्पट भावात चोरून मद्य विक्री सुरु असल्याची माहिती खबऱ्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. पुष्पेंद्र थापा यांना दिली. त्यांनी लगेच ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांना सांगितली त्यानुसार 
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे यांनी सापळा रचून माहितीची खात्री करून घेतल्यानंतर सिंग बियर शॉप चा मॅनेजर मुनीबलाल रुद्रप्रतापलाल श्रीवास्तव हा चोरीचा मार्गाने बियर व वाइनची  चढ्या भावाने विक्री  करताना आढळून आला त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे  बियर व वाइन  चे ९२ बॉक्स पोलिसांनी केलेल्या छाप्यात मिळून आले आहेत या मालाची किंमत २,६१,७०० रुपये एवढी किमतीचे हे मद्य १९/०४/२०२० रोजी  बियर, वाईन जप्त केली आहे . या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे नोंद क्र. T ३१२/२०२० नुसार भा द वि स चे कलम १८८ , २६९, २७०, म प्रोव्ही. ऍक्ट ६५(ई) , कोविड १९ उपाय योजना २०२० चे नियम ११ नुसार 
सिंग बियर शॉप चा मॅनेजर मुनीबलाल रुद्रप्रतापलाल श्रीवास्तव  यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. 


ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे, पोलीस उप निरीक्षक चेतन पाटील, सहा. फौजदार चंद्रकांत पोशिरकर , अनिल वेळे , पो. हवा. अर्जुन जाधव. अशोक पाटील, संदीप शिंदे, किशोर वडिलें, अविनाश गर्जे, पो. ना. संजय शिंदे, प्रदीप टक्के, पुष्पेंद्र थापा, सचिन सावंत, पो. शि. सतीश जगताप, राजेश श्रीवास्तव, महेश वेल्हे, विकास राजपूत, जयवंत कांडेलकर या सर्व पोलिसानी संयुक्तपणे कारवाई केली असून आता स्थानिक गुन्हे शाखाचे किशोर वाडिले हे पुढील तपास करीत आहे.