पत्रकार धीरज परब यांनी दिली मुख्यमंत्री रिलीफ फंडात मदतपत्रकार धीरज परब यांनी दिली मुख्यमंत्री रिलीफ फंडात मदतपत्रकार धीरज परब यांनी दिली मुख्यमंत्री रिलीफ फंडात मदतपत्रकार धीरज परब यांनी दिली मुख्यमंत्री रिलीफ फंडात मदत
देशात उद्भवलेल्या परस्थितीचा केंद्रसरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने अतिदक्षतेने सामना करत आहे. संसर्गजन्य रोगामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता लाखोंजनांचे हात मदतीसाठी पुढे सरसावले आहेत त्यातच छोटेसे कर्तव्य म्हणून वरिष्ठ पत्रकार धीरज परब यांनी मुखमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा केली आहे.
देशामध्ये वाढलेले कोरोना रोगाचे थैमान, वाढते कोरोना विषाणू चे संक्रमण आणि रोगाच्या साथीबरोबरच देशावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. देश आर्थिक संकटात सापडला आहे पहिलीच देशाची आर्थिक परिस्थिती खालावलेली असताना त्यात कोरोनाच्या महामारीचा फटका आर्थिक व्यवस्थेला बसला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या परीने जनतेची सुरक्षा ,हीत आणि आरोग्य लक्षात घेऊन उपाययोजना करत आहे.
आपण भारतीय म्हणून प्रत्येक व्यक्तीचं आपल्या मातीची नाते जोडलेल आहे. देशात महामारीमुळे उभे टाकलेल्या संकट काळात प्रत्येकाने आपली जिम्मेदारी आणि जबाबदारी ओळखून आणि काळाची पावले ओळखून या संकटाचा मुकाबला करण्याचे ध्येय ठेवले पाहिजेत हीच भावना मनात ठेवून या उद्भवलेल्या संकटमय परिस्थितीत आपल्या कुवतीप्रमाणे सरकारला सहाय्यता करण्याचे काम केले पाहिजे ही भूमिका ठेऊन पेशेने पत्रकार असलेले आणि मीरा-भाईंदर मधून निसर्गप्रेमी व परखड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे असे वरिष्ठ पत्रकार धीरज परब यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सहायता फंडात ऑनलाइन द्वारे ५००१ रुपयाची मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी जमा केला आहे. या मीरा-भाईंदर शहरांमधून मुख्यमंत्री मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधी फंडात मदत करणारे मीरा-भाईंदर मधले पहिलेच पत्रकार ठरले असल्याची माहिती समोर येताना दिसत आहे. हे काम नक्कीच प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहे.