गेल्या ४८तासात मीरा-भाईंदर शहरात आढळले ८५ रुग्ण
कोरणा विषाणूचा सुरू असलेला थै थैयाट मिरा-भाईंदर शहरात पहायला मिळाला आहे. सगळीकडे वाढता कोरोना चा प्रभाव शहर झपाट्याने वाढत आहे दिवसेंदिवस मिळून येणारे कोरोनाचे नवीन रुग्ण येणाऱ्या काळाचे भयावह परिस्थितीचे संकेत देणारे चित्र निर्माण करणारे आहे मागील ४८ तासांमध्ये मिरा-भाईंदर शहरात ८५ रूग्ण सापडल्यामुळे शहरात खळबळ उडाली असून त्याच बरोबर शहरातील नागरिकांमध्ये चिंता वाढलेले आहे पण सत्ताधारी मात्र राजकारण करण्यातच गुंतलेले पाहायला मिळत आहेत.
देशासह राज्यात व शहरात संकटाचे वातावरण निर्माण असताना निर्लज्जपणा चे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षाने जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष न देता या संकटकाळात राजकारण सुरू ठेवल्याने बीजेपी ची अर्थात भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात नाचक्की होताना दिसत आहे. पक्षाचे कार्यकर्तेही पक्षाला टोमणे मारताना आढळून येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का तर नक्कीच लागला आहे. मिरा-भाईंदर शहरात भाजपाची एक हाती सत्ता असतानाही शहरातले भाजपाचे कार्यकर्ते अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचा कारणावरून राजकारण तर कधी मोफत वस्तू वाटण्याच्या नावाखाली राजकारण करताना आढळून येतात त्यामुळे राजकीय महत्वकांक्षा बाळगलेल्या नागरिकांची मानसीकता शहराचे नागरिक जाणून आहेत. शहरात दररोज वाढणारा रुग्णांचा आकडा भविष्यकाळात धोका निर्माण करणारा दिसत असतानाही शहरातल्या लोकप्रतिनिधींना आणि राजकीय नेत्यांना याचे सोयरसूतक पडले नाही काय असा प्रश्न तयार होत आहे. या उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमध्ये आणि लॉक डाऊन फायदा घेत, काही व्यापाऱ्यांनी जनते कडून लूटमार सुरू ठेवली आहे घरपोच सेवा देणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांनी जनतेची चांगलीच लूट सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक वस्तूची चढ्या भावाने विक्री होते, दाम दुप्पट करून लोकांच्या मजबुरीचा फायदा घेण्याचे काम या व्यापारी वर्गाकडून केले जात असताना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. या घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली पसरलेल्या व्यापारी वर्गांच्या पाठीवर या राजकीय नेत्यांचा हात तर नाही ना, या राजकीय नेत्यांचा आशीर्वाद तर नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे .आर्थिक मंदी मध्ये भरडलेला हा सर्वसामान्य वर्ग गेल्या दोन महिन्यापासून सतत लॉक डाऊन च्या यातना भोगत असताना हातावरचे पोट असलेला हा सर्वसामान्य माणूस कोरोनाच्या भीतीने आपला जीव मुठीत धरून जगत असताना येथे सेवा देणाऱ्या वर्गाकडून होणारी लूट उघड्या डोळ्यांनी सहन करताना दिसत आहे. याकडे प्रशासन तरी गांभीर्याने लक्ष देईल काय अशा भावना नागरिक व्यक्त करताना दिसतात. ना शासनाचे लक्ष आहे ,ना स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र टक्केवारीच्या राजकारणा व्यतिरिक्त लोकांच्या समस्याकडे लक्ष देण्यात तेवढे तरी काळजीवाहू नाहीत अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत
गेल्या आठ दिवसापासून कोरोना रुग्णांचा आकडा शहरात झपाट्याने वाढत आहे प्रत्येक दिवशी नवीन रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत आहे यात सेवा देणाऱ्या वर्गाकडून मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमणाचा फैलाव होताना दिसतो आहे तर गेल्या ४८ तासांमध्ये शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा एकाएकी वाढून ८५ वर नवीन रुग्ण गेल्या ४८ तासात आढळल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही शहराचे चांगले असले तरीही आतापर्यंत २९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेल्या ४८ तासांमध्ये ४५ रुग्ण बरे झाले आहेत आणि आतापर्यंत शहरात १४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या ४८ तासात २ जणाला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे हीच परिस्थिती अशाच पद्धतीने राहिले तर शहराला या कोणाच्या संक्रमणाचा विळखा पडण्यास वेळ लागणार नाही आताही वेळ गेलेली नाही प्रशासनानेही जागरूक होऊन या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला हवे आणि नागरिकांचीही त्याला पुरेपूर साथ मिळायला हवी तरच हा आकडा आपण थांबवू शकतो अन्यथा येणारा काळ मात्र भयानक परिस्थिती निर्माण करणारा असेल यात शंका नाही