मीरा-भाईंदर करांसाठी आमदार सरनाईक यांनी सुरू केली मोफत जंतुनाशक फवारणी सेवा
मिरारोड : डोळ्याला न दिसणाऱ्या कोरोना विषाणू ने संपूर्ण जग हैराण झाले आहे. हतबल झालेल्या मानवाला या कोरोनाच्या महामारिसी झुंज देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या संसर्ग जन्यसाथीवर कोणतेही औषध सध्यातरी आलेले नसल्याने सावधान गिरी बाळगणे हाच पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे जनतेचे आरोग्याची काळजीघेण्याचा दृष्टीने आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर करांसाठी शहरात मोफत जंतुनाशक फवारणी सुरू करण्याचा उपक्रम राबविण्यास सुरवात केली आहे.
कोरोनासी महामारीशी संपूर्ण देश लढत आहे मीरा-भाईंदर शहरात ही कोरोना ग्रस्तांचा आकडा दररोज वाढत असतानाचं शहरातील नागरिकांच्या मदतीला कोरोनाची साथ आल्यापासून जनतेच्या सेवेत सदैव तत्पर पणे राहत असलेले ओवळा-माजिवडा चे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक हे या संकट काळात गरिबांचे मसिहा बनलेले आहेत भुकेल्यांची भूक ओळखून कित्येक दिवस मोफत भोजन उपलब्ध करून देऊन नागरिकांची सोय केली तर नागरिकांच्या मदतीला धावून गेले. आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर मध्ये मोफत औषध फवारणी सेवा सुरु केली आहे. कोरोनाला या लढाईत हरवण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवला आहे. या संकट काळात नागरिकांना संदेश देतांना म्हणाले की, कोरोनाला घाबरून न जाता त्याच्या सोबत टक्कर देत जगायला शिकलं पाहीजे. वाढता संसर्ग आणि तोंडावर येऊन ठेपलेला पावसाळा या पावसाळ्यात रोगराईचे प्रमाण अधिक असते म्हणून शहरात झोपडपट्टी ते सोसायटी पर्यंत मोफत औषध फवारणीसाठी टीम तयार केली आहे आटोमॅटिक मशीन द्वारे ही फवारणी केली जाणार आहे. शहरात सर्वत्र औषध फवारणीची गरज असताना अद्याप काही ठिकाणी औषध फवारणी झालेली नाही अशा ठिकाणी मागणीनुसार त्या-त्या ठिकाणी मोफत औषध फवारणी केली जाणार आहे. त्
यासाठी २५ जणांची टिम बनवण्यात आली असून याचा खर्चा संपूर्ण आमदार सरनाईक यांनी उचलला आहे. ही मोफत जंतुनाशक फवारणी या टिमच्या माध्यमातून १० मे ते १० जुलै २०२० पर्यंत सेवा पुरविण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार सरनाईक यांनी दिली.
ज्या ज्या ठिकाणी अद्याप जंतुनाशक फवारणी झालेली नाही किंवा गरजे नुसार आणि नागरिकांच्या मागणी नुसार झोपडपट्टी,सोसायटी या इतर ठिकाणी औषध फवारणी झाली नसेल आणि जिथे औषध फवारणीची गरज आहे अशा ठिकाणी फवारणी केली जाईल नागरिकांनी संपर्क साधून आपला परिसर जंतुनाशक औषधांने फवारणी करून घ्यावा असेही अवहान त्यांनी केले आहेत नागरिकांना संपर्कासाठी कार्यालयाचा दूरध्वनी ०२२-२८११५०५० व हाकिव्हा वॉटसअप ९१३६५४९१७२ नंबरवर संपर्क करावा लागेल असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.