फरार असलेला दिलीप घेवारे अखेर अडकला पोलिसांच्या सापळ्यात
सरकारच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्यसूत्रधारआरोपी मागील पंचवीस दिवसापासून पोलीसांना चकमा देत फरार झालेला मुख्यआरोपी महापालिकेचा सहाय्यक संचालक आणि नगररचनाकार दिलीप घेवारे अखेर गुजरातचा सुरतमध्ये मंदिरात दर्शन आला असतांना पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात अलगद अडकला आहे.
देशाचे आणि समाजाचे खरे दुष्मन असलेले घोटाळेबाज मंडळींनी संपूर्ण देश पोखरून टाकला आहे. अनेक घोटाळे या देशात झालेले पाहायला मिळत आहेत. तर अनेक घोटाळेबाज कायद्याच्या पळवाटांचा फायदा घेऊन मोकाट फिरत आहेत . घोटाळा हा शब्द देशातील नागरिकांच्या अंगवळणी पडलेला दिसून येत आहे. पांढरपेशी गुन्हेगारीत देश डूबत चाललेला आहे ज्यांच्याकडे जनतेचे हित पाहण्याची, सांभाळण्याची जवाबदारी सोपवली आहे. तेच चोर बनले आहेत. गेल्या काही वर्षांपासून गाजत असलेला मीरा-भाईंदर शहरातील गाजलेल्या यूएलसी घोटाळा हा शहराला कलंकित ठरला आहे. राजकीय आशीर्वादात झालेल्या या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीला आज २५ जून गुरुवार रोजी सकाळी साडे वाजताच्या दरम्यान देवदर्शनाला येणार असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेला महापालिकेचा सहाय्यक संचालक आणि नगररचनाकार दिलीप घेवारे हा अलगद अडकला आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घेवारे यांना बेड्या ठोकून कोर्टात हजर केले असता कोर्टाने २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घेवारे यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे येथील जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आज त्याच्या अटकपूर्व जामिन अर्जाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात ठेवण्यात आली होती. त्या आधीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घेवारे याला अटक होताच गुन्हे शाखेच्या पथकाने महापालिका आयुक्तांना त्याला अटक केल्याची माहिती पत्रा द्वारे कळवण्यात आली आहे. तर एका पथकाने नगररचना विभागातून काही महत्वाचे कागदपत्रे ताब्यात घेतले असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे . या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना आधीच अटक केली आहे. त्यामध्ये मीरा भाईंदर महापालिकेचे निवृत्त साहाय्यक नगररचनाकार सत्यवान धनेगावे (५४), कनिष्ठ आरेखक भरत कांबळे (५६) आणि वास्तुविशारद मदतनीस शेखर लिमये (५५) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सध्या हे आरोपी तुरुंगात आहेत.
यूएलसी घोटाळा करून तब्बल १०२ कोटीच्यावर सरकारला लावला चुना
मीरा-भाईंदर शहरात २०१६ मध्ये सुमारे १०२ कोटींचा यूएलसी घोटाळा झाला होता. मीरा-भाईंदर शहराच्या विकास आरखड्यानुसार आणि शहरात २००० साली युएलसी अर्थात कमाल जमीन धारणा कायदा लागू करण्यात आला आहे. मात्र, हा कायदा लागू नसल्याचे बनावट दाखले देऊन शासनाची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील अनेक जमीन यूएलसी कायद्याच्या कक्षेत येत असूनही त्या येत नसल्याचे बनावट दाखले ठाणे इथल्या यूएलसी विभागाने दिले होते. त्यामुळे शासनाला देय असणाऱ्या असंख्य सदनिका परस्पर विकल्या गेल्या. यात शासनाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी २०१२ साली ठाणे पोलिसात तक्रार दाखल झाली होती. बनावट दाखले देणारे यूएलसी विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी भास्कर वानखेडे यांचा पुढे मृत्यू झाला. मात्र याच विभागाचे सहायक नगर रचनाकार असणाऱ्या दिलीप घेवारे आणि सत्यवान धनेगावे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नव्हती. तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या व राजकीय वरदहस्तामुळे ते मोकाट सुटल्याचा आरोप होत आलेला आहे. याच काळात ४ विकासकासह ५ जणांना बेड्या ठोकल्या होत्या ते आरोपी जामिनावर सध्या बाहेर आहेत.
बनावट प्रमाणपत्राच्याआधारे मनपा कडून परवानग्या घेऊन इमारतींचे बांधकाम केले व शासनाची आर्थिक फसवणूक केली होती. तसी तक्रार देण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने ठाणे पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. त्यावेळेस या गुन्ह्यात पाचजणांना अटक झाली होती. परंतु या गुन्ह्याचा तपास अचानकपणे थंडावला होता. या घोटाळ्याची फाईल ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने पाच वर्षानंतर पुन्हा उघडून तपास सुरू केला त्यामुळे या प्रकरणातले बडे मासे पोलिसांच्या गळाला लागले आहेत . अनेक जाणकारांना असेही वाटते आहे की, राजकीय आशीर्वादा शिवाय हा घोटाळा पूर्ण होऊच शकत नाही अशी भावना व्यक्त होत आहे. आता पोलिसांना घेवारे यांच्याकडून या घोटाळ्यातले कोणते गौडबंगाल हाताला लागते हे पाहावे लागणार आहे.