कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डयांना पोलिसांचे भय राहिले नाही काय ?


कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत  जुगार अड्डयांना पोलिसांचे भय राहिले नाही काय ?

-----------------

★ एकदा कारवाई होऊनही परिस्थीती ‘जैसे थे'

★ गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तींचा ‘येथे' वावर


जुगार हा जीवनाला व संसाराला उद्धवस्त करणारा खेळ आहे. अनेकांचे संसार जुगारामुळे देशोधडीला लागले आहेत. हा जुगार मुंबईत करोडो रुपयांची हेराफेरी करतो मुंबईत जुगाराचे अड्डे चालवणारे व मुंबई पोलीस यांचे काही साटेलोटे आहे की काय? असे विचारण्याची वेळ आली आहे. याला कारणही तसेच आहे, वेळेनुसार आज अनेक ठिकाणी ऑनलाईन जुगार व त्यावर मुंबई पोलीसांकडून शोध घेऊन धाडी टाकल्याच्या अनेक घटना आहेत. परंतू, कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांच्या नाकावर टिच्चून बिनदिक्कतपणे जुगार अड्डा चालू आहे. कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या जुगार अड्डयाना  पोलीसांचा आशीर्वाद लाभला आहे का? असा प्रश्न शहरातील नागरीकांकडून विचारला जाऊ लागला आहे. पोलिसांच्या पोलिसांच्या वरदहस्थाशिवाय जुगार अड्डे चालवणे शक्यच नाही अशी भावना स्थानिक परसदरातील नागरिक व्यक्त करत आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल या अड्ड्यावर होत असून मोठ्याप्रमाणात गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तींचा येथे वावर आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र नगर बिट चौकीच्या मागे. बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, दत्त पाडा, बोरिवली (पूर्व) बस थांबाच्या मागे सुरु असलेल्या या जुगार अड्ड्यावर यापुर्वी 25 ऑगस्ट रोजी मुंबई पोलीसांच्या समाजसेवा शाखेने धाड टाकली होती. परंतू पोलीसांची पाठ फिरताच पुन्हा जैसे थे परिस्थीती असल्याचे चित्र असल्याने मुंबई कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल नागरीक विचारू लागले आहेत. अनेकांना देशोधडीला लावणाऱ्या व तरुणाईला आपल्या जंजाळात ओढणाऱ्या हा अड्डयांवर कडक कारवाई करून हे कायमचे बंद कधी होणार ही भावना व्यक्त होतांना दिसून येत आहे.