: 6 वर्षाच्या मुलीसह महिलेची इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या

 मीरा रोड : 6 वर्षाच्या मुलीसह महिलेची इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या



 काशिमीरा :-  मीरारोड येथील नित्यानंदनगर परिसरात शनिवारी दुपारी एका महिलेने तिच्या सहा वर्षाच्या मुलीसह सहा मजली इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.


मिरारोड पूर्व मधिल नित्यानंद नगर येथील गौरव गॅलेक्सी शांती गार्डन परिसरात राहणाऱ्या रेखा देवासी (28) यांनी आपल्या  अंकिता नावाच्या  सहा वर्षाच्या चिमुरडी सह आत्महत्या केली आहे. या घटनेतील आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.  महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, पत्नी काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती.

सुरेश हरिरामजी देवासी (३१) हे रेखा आणि तिच्या दोन मुलींसह मीरा रोड येथील नित्यानंदनगर भागातील गौरव गॅलेक्सी फेज १ या सहा मजली इमारतीत राहत होते.  पूजा (३) असे दुसऱ्या मुलीचे नाव आहे.  सुरेशचे स्टेशनरीचे दुकान आहे.  शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास रेखाने मुलगी अंकितासोबत इमारतीवरून उडी मारली.  हा प्रकार पाहून इमारतीच्या चौकीदाराने तातडीने सुरेशला माहिती दिली.  दोघांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.  रेखा आपल्या लहान मुलीला घरी सोडून मोठी मुलगी अंकिता हिला लिफ्टमध्ये सहाव्या मजल्यावर घेऊन गेली आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे.  काशिमीरा पोलिसांनी घटनास्थळ आणि घराची पाहणी केली असून याप्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदवण्यात येत असल्याचे सांगितले.


 "महिलेच्या पतीने सांगितले की, पत्नी काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. घटनेचा सखोल तपास सुरू आहे." वरिष्ठ पोलिस निरीक्षक काशिमीरा पोलीस ठाणे

Popular posts
शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश
कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डयांना पोलिसांचे भय राहिले नाही काय ?
वट पौर्णिमा व छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अंनिसचा वृक्षारोपण कार्यक्रम
Image
नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांना पोलीस व एफ डी विभागाचे राहिले नाही का भय ? की अधिकाऱ्यांनी घेतले आहे का झोपेचे सोंग ?
तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन, आयसीयू बेड्स, फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन जिल्ह्यांना करून द्यावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आरोग्य विभागास सूचना