वट पौर्णिमा व छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अंनिसचा वृक्षारोपण कार्यक्रम

 वट पौर्णिमा व छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अंनिसचा  वृक्षारोपण कार्यक्रम


कल्याण :   जनसेवेचा, जनजागृतीचा विडा उचलून सर्वसामान्य जनतेच्या मनातली असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सतत कार्यरत असलेले कार्यकर्ते  वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून जागृती  घडवून आणतात.  तेवढीच जागृती , आणि प्रेम निसर्गावर सुद्धा करावे तरच जीवन हे सुखी होऊ शकते अशी भूमिका मांडत , कृती च्या माध्यमातून समाजासमोर देत असतात नुकत्याच साजऱ्या झालेल्या वटसावित्री पौर्णिमेच्या आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कल्याण शाखेतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम शनिवार दिनांक २६ जून २०२१ रोजी सकाळी दहा वाजता कल्याण पूर्वेकडील, पत्री-पूलाजवळील नेतवली टेकडीवरील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला. 

कार्यक्रमाची सुरुवात संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत देडगे यांच्या निवासस्थानी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून झाली. नंतर तिथून सर्व कार्यकर्ते टेकडीच्या वरच्या भागातील मोकळ्या जागेत आले आणि तिथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ३० रोपे लावण्यात आली, त्यात पळस, महोगनी, जांभूळ, सीताफळ, साग, बांबू, पळस, बकुळ इत्यादि रोपांचा समावेश आहे. 

नैसर्गिक मिळालेल्या संपत्तीचे जतन,संगोपन करणे  जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच त्याला पोषक असी कृती करून त्यात भर टाकणे हेही महत्वाचे, माणसाला निरोगी ठेवण्याचे काम निसर्ग करत असतो, वृक्षापासून मिळणारे ऑक्सिजन आम्हाला जीवदान देत असतात त्याची जपणूक होणे संगोपन होणे महत्त्वाचे मानून  अंनिस द्वारा आयोजित या वृक्षारोपणास 'समता संघर्ष' संघटनेचे प्रमुख शैलेश दोंदे, 'पुरोगामी विचार मंच'चे महाराष्ट्र राज्य प्रमुख बंडू घोडे सर, व्यावसायिक जगदीश ठाकूर 'अंघोळीची गोळी' मोहिमेचे  तसेच महा अंनिसचे कार्यकर्ते अविनाश पाटील, महा. अंनिस कल्याण, डोंबिवली शाखेचे पदाधिकारी, जिल्हा राज्य पदाधिकारी आणि अनेक जुने-नवे कार्यकर्ते तसेच स्थानिक तरुण मुले आणि समाजसेवक हजर होते. सर्वांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. वृक्षारोपणासाठी जागा निवडणे, खड्डे खोदणे, कार्यकर्त्यांना अल्पोपहार यासाठी हनुमंत देडगे यांनी, नियोजनासाठी शरद लोखंडे, दत्ता बोंबे, तानाजी सत्वधीर, शुशील माळी यांनी मेहनत घेतली. तसेच शाखा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी नियोजनासोबतच कृषि पर्यवेक्षक डी वाय कोळी यांच्या मदतीने रोपे उपलब्ध करून दिली. 


वृक्षारोपण झाल्यावर शरद लोखंडे यांनी या कार्यक्रमामागील संकल्पना समजावून सांगितली तसेच केवळ वृक्षारोपण करूनच थांबायचे नाही तर ही रोपे जगविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी  वृक्षारोपण ठिकाणी येऊन रोपांना पाणी घालणे, त्यांची निगा राखणे ही कामे सुद्धा करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. अविनाश पाटील यांनी  खिळेमुक्त झाड या उपक्रमांची माहिती दिली.