श्रीमंताकडून मिळता धन तेंव्हा बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण लक्ष्मी दर्शनापुढे प्रभाग अधिकाऱ्यांचे सुरु आहे लोटांगण
मीरारोड:अवैध बेकायदेशीर बांधकामांना सहकार्य करणाऱ्या मनपाच्या दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी शहरवासियांची तिव्र इच्छा असतांनाही मनपा आयुक्त यांनी चुप्पी साधण्याचे धोरण स्विकारल्यामुळे संशयाचे जाळे | आयुक्ताभोवती फिरायला लागले | आहे. शेकडो येणाऱ्या तक्रारी | कार्यालयात पडून आहेत मात्र | आयुक्त प्रभाग अधिकाऱ्यावर | एवढे मेहरबान कसे अशा प्रश्न | जनतेतून उठत आहे. हात कोणाचे लक्ष्मी दर्शनाने रंगले जात आहेत याचे उत्तर जनतेला कोण देणार हा प्रश्न पडतो आहे. दिसत गरीबांच्या पत्र्यावरी चाले हातोडा, श्रीमंताच्या समोर हात जोडाअशी भूमिकाअधिकाऱ्यांनी घेतलेली दिसत आहे. पोलिसांचा फौजफाटा घेऊन पत्राच्या गरीबांच्या घरावर बलडोजर चालवणारे प्रभाग अधिकारी श्रीमंताच्या बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देताना दिसत आहेत. प्रभाग ६ मध्ये अनेक हॉटेल, बार, लॉजिंगसह पक्क्या चाळीचे बांधकामे मोठ्या प्रमाणात सरु असतांनाही प्रभाग अधिकारी या श्रीमंताच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा चालवतांना दिसत नाही. या संदर्भात जनता जनार्धनांची भावना ऐकली असता श्रीमंताकडून पैसा मिळतो, गरीब जनता काय देणार अशीच काहीशी समिश्र प्रतिक्रिया या पत्र्याच्या रुममध्ये राहणाऱ्या जनतेकडून ऐकायला मिळत आहे. सुपारी घेऊन तोडक कारवाई करणारे व असैध बांधकामांना संरक्षण देण्यासाठी लाखोची माया जमा करणारे प्रभाग अधिकारी आणि इंजिनियर व कर्मचारी वर्ग याची सद्या कमाई आयुक्तापेक्षा वाढलेली आहे असे अनेक जाणकारांनी बोलून दाखवले.
तक्रारदारांना चुकीचे स्पष्टीकरण देणारे प्रभाग अधिकारी वेळ मारुन नेऊन तक्रार दारासह मनपाच्या व वरिष्ठांच्या डोळ्यातधुळफेक करत आहेत. त्यामुळे आपल्या कामात कसुर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनपा आयुक्त कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न जनतेतून समोर येत आहे. आयुक्त महोदय जर खरच निष्कलंक, चारित्र्यवान असतील, भ्रष्टाचारी नसतील तर त्यांनी प्रभाग ६ च्या प्रभाग अधिकाऱ्यांना बडतर्फ करुन दाखवावे असा प्रतिप्रश्न स्थानिक तक्रार दारांमधुन केला जात आहे. पण हे कधी होणार, खरोखरच असे होईल का हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. गरीबांच्या पत्रारुम वरती चालणारा घन नवीन वर्षात तरीश्रीमंताच्या बेकायदेशीर बांधकामांवर चालेल का? हा प्रश्न आज या वर्षाच्या शेवटच्या क्षणी अनुत्तरीत राहिला आहे. बघुया नवीन वर्ष २०२० ची सुरुवात हे श्रीमंताच्या बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यात जाईल की त्यावरती तोडक कारवाई होईल की श्रीमंतापुढे लोटांगण घातले जाईल.