रिक्षाचालकांना वेगवेगळ्या बहाण्याने लुटणारी टोळी कार्यरत

, रिक्षाचालकांना वेगवेगळ्या बहाण्याने लुटणारी टोळी कार्यरत बदलापूर : दिवसेंदिवस लूटमार,फसवेगिरी,चोरी मोठ्याप्रमाणात होतांना दिसून येत आहे घटना ह्या थांबता थांबत नाहीत वेगवेगळ्या प्रवृत्ती या घटना घडवण्यासाठी नवनवीन प्रयोग केलेले पाहायला मिळत आहेत. रिक्षाचालकांना लुटणाऱ्या टोळीचा बदलापूर पोलीस शोध घेत आहेत.


 


आपल्या बदलापुर (प) पो.स्टे हद्दीतील रिक्षा चालकांना लुटण्यासाठी वेगळा फंडा वापरून रिक्षाचालकांना गोड बोलून त्यांच्याशी चर्चा करून आम्हांला रिक्षा भाड्याने घेऊन त्याची लूट केली जात आहे बदलापूर प पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घटनांचा वाढता आलेख पहिला मिळत आहे. ग्राहक बनून रिक्षा चालकांना विनंती केली जाते की माझी पत्नी सेंट्रल रुग्णालयात मध्ये भरती केले आहे , तसेच ती गरोदर आहे तिला प्रसूतीसाठी नेले आहे.असे कोणतेही खोटे कारण सांगून एक इसम रिक्षा चालकांना सांगतात. विनंती करतात हवे तर तुमचे परतीचे भाडे काय असेल ते मी देतो नाही तर हे भाडे आत्ताच घ्या . असेही बोलत असतात त्यानंतर रिक्षाचालक भाडे घेऊन रुगणालायमध्ये जातो तेव्हा तुम्ही येथेच थांबा मी रुग्णालयामध्ये जाऊन येतो असे सांगीतले जाते. थोड्या वेळाने आल्यानंतर सांगतात मला मुलगा झाला आहे मुलगी झाली आहे. असे खोटे सांगून तो इसम लाडु किवा पेढा देतात त्या मध्ये काहितरी गुंगीकारक पदार्थ मिसळलेला असतो त्यामुळे काही वेळाने रिक्षा चालक याला गुंगी येते तेव्हा त्याच संधीचा फायदा घेत रिक्षाचालकाच्या जवळील मौल्यवान वस्तू काढून पळ काढतात.अशी टोळी आपल्या बदलापुर मध्ये आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. असा प्रकार जर आपल्याकोणासी घडत असेल तर सावध राहावे आणि त्याबाबत अशी काही शंका असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी जेणेकरून अशा घटनांना लगाम बसवण्यास फायदा होईल त्याच बरोबर कोणतीही माहिती अशाप्रकारच्या टोळी संदर्भात माहिती मिळाली तर ती माहिती तात्काळ पोलिसांकडे द्यावी असे अहवान करण्यात येत आहे.