नशेच्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांना पोलीस व एफ डी विभागाचे राहिले नाही का भय ? की अधिकाऱ्यांनी घेतले आहे का झोपेचे सोंग ?

 पोलीस व एफ डी च्या अधिकाऱ्यांनी घेतले झोपेचे सोंग ?, की पोलिसांचे राहिले नाही भय


 मिरा-भाईंदर शहरात दिनदहाडे प्रतिबंधित असलेला वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, नशेचे पदार्थ, सर्रासपणे चोरीछुप्या मार्गाने शहरातील छोटी छोटी दुकाने,  पानट्ट्यावर (शहरातील जवळपास 99 % ) विक्री होत आहेत. यांमुळे नवतरुणाई नशेच्या विळख्यात जाऊ लागली आहे. नशाखोरीमुळे तरुणांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. या कडे पोलीस विभाग व एफ डी ए कडून कानाडोळा केलेला दिसून येऊ लागले आहे  यामुळे पोलीस व एफ डी च्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे की, त्यांचे या माफियांवर भय राहिले नाही  काय असा सर्वसामान्याना प्रश्न मनात निर्माण झाला आहे. 


मीरा-भाईंदर शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रतिबंधित असलेल्या नशेच्या पदार्थांची विक्री चोरीछुप्प्या मार्गाने फार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. तरुणाईला जहरिली नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या माफीयांचे जाळे शहरभर पसरलेले आहे, अनेक टोळ्या या क्षेत्रात कार्यरत झालेल्या दिसून येत आहेत. कारवाई चे जरीसत्र सुरू ठेवलेले असले तरीही पोलिसांच्या कारवाईचे भय या माफियाना राहिलेले दिसून येत नाही अनेक वेळा पोलिसांनी केलेली थातूरमातूर कारवाईमुळे अनेक माफियांना भय राहिलेले नाही. तर शहरातली गुप्तचर यंत्रणा , पोलीस खात्यातील इंटेलिजंट ब्युरो काय करत आहे ? हेच कळायला मार्ग राहिले नाही. नशाखोरीचा व्यापार चालवणे एवढे सोपे आहे काय ? हे पोलिसांच्या आशीर्वादशिवाय शक्य आहे काय ? यांना पाठीशी घालणारा कोणीतरी असेलच ना ? कोणाचा ना कोणाचा तरी हात असतो का नाही ? असे अनेक प्रश्न जनतेतून येऊ लागले आहेत.  खरंच या नशेच्या आड जहर देणाऱ्या माफीयांना वाचवणारा कोण ? पोलिसांकडून यांच्यावर  कायमस्वरूपी कडक कारवाई का केली जात नाही. पोलिसांना या माफीयांचे धागेदोरे लागत नाहीत काय? अन्न व औषधी प्रशासन विभाग यांनी झोपेचे सोंग घेतले आहे का ? की कारवाई न करण्यासाठी हप्ताखोरीत या विभागाचे अधिकारी कर्मचारी गुरफटले आहेत की काय अशी शंका येऊ लागली आहे . अनेक शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन, शाळा , कॉलेज, दवाखाने च्या परिसरात आजूबाजूला लागूनच अनेक ठिकाणी प्रतिबंधित असलेल्या पदार्थांची विक्री होते हे पोलिसांना अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत असून देखील कारवाई होत नाही हे फार शहरवाशीयांसाठी खेदजनक, दुःखदायक बाब आहे. आशा प्रतिकीर्या शहरात उमटू लागल्या आहेत.