मीरा-भाईंदरच्या सौंदर्याचा भाग म्हणजे या परिसराला निसर्गाने दिलेले डोंगर नदी-नाले त्याचबरोबर समुद्रांच्या छोट्या-मोठ्या खाड्या आणि त्या खाड्याभोवती वसलेला तिवरांच्या झाडांचा परिसर नेहमी हिरवळ वाटणारा हा परिसर या परिसरातल्या तिवरांच्या झाडांची कत्तल सर्रासपणे या शहरात भूमाफियाचा माध्यमातून केली जात आहे. भाईंदर पाश्चम मध्य राह, |मोरवा, उत्तण, धावगा परिसरासह अनेक पाडे त्याचबरोबर मीरा रोड पूर्व मध्ये असलेला पेंकर पाडा,घोडबंदर चेना , काजुपाडा सह घोडबंदर ते भाईंदर सागरी किनारी पट्टा हा तिवरांच्या झाडांनी व्यापलेला परिसर आणि या तिवरांच्या यादामले या परिसराचा आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातो. पर्यावरणाचा समतोल ठेवणे गरजेचे असताना या पर्यावरणाशी छेडछाड करणारे आणि पर्यावरणाचा समतोल बिघटवणारेभमाफियांनी मोठ्या प्रमाणात या मनपा क्षेत्रात मातीचे भराव करून तिवरांच्या झाडांची कत्तल केली आणि तिवराची झाडे नष्ट केली जात आहेत त्यामुळे पर्यावरणाचा हास होऊ लागला आहे. घोडबंदर तेभाईंदर हा खाडी लगतचा परिसर हा तिवरांच्या वृक्षांनी व्यापलेला मातीचे परिसर आहे. हा परिसर भूमाफियांचा डोळ्यात खूपच सलत आहे . माजी आमदार यांचा असलेला वन्लब त्याचबरोबर अनेक वैद्य-अवैद्य बांधकामांने या परिसरात पाय पसरलेले दिसत आहेत. अनेक भमाफियांचा नजराया असलेल्या जाग्यावरती पडलेले आहेत. त्यामुळे मैग्रोज नष्ट करण्याचा घाट या माफियांनी लावलाआह. रॅबिट टाकून ही झाडे बुजवण्याचा प्रकार सर्रासपणे या परिसरात प्रकार सर्रासपणे या परिसरात सुरू आहे. अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी जात असतानाही अधिकाऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष या निसर्ग निर्मिती सौंदर्याला नष्ट करण्यात एक महत्त्वाचे कारण ठरत आहे मैग्रोज नष्ट करण्यासाठी भूमाफियांनी वेगवेगळ्या शक्कली लढवल्या आहेत. अनेक वेळा तिवरांची कत्तल प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तिवरांच्या कत्तलीला जबाबदार कोण?