बनावट दारू मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली असून खार येथे कारवाई करून बारा लाखांची बनावट दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाअटक केली आहे. राज्य उत्पादन विभागाच्या वतीने भरारी पथके तयार करण्यात आली असून बनावट दारू विक्री, बेकायदा विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यावर नजर ठेवली जात आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता श्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जे. एम. खिल्लारे यांच्या भरारी पथकाने खारदांडा परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सात बनावट दारूच्या बाटल्या सापडल्या. अधिकचौकशीमध्येकांदिवली यथील महाराष्ट्र नगरमधील एका खोलीत बनावट दारू बनवीत आसल्याची माहिती मिळाली. पथकानेयाठिकाणी छापा टाकून सुमारे १२ लाखांची बनावट दारू हस्तगत केली. बनावट दारूसह अनेक बॅण्डच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, बुचे, ड्युटी फ्रीच्या पिशव्या तसेच बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारेही इतर साहित्यही जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेले दोघे स्वस्त मिळणारी दारू दुकानातून खरेदी करीत आणि महागडे बँड असलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यामध्ये भरून त्या सील करीत. महागडीदारूड्युटीफ्रीअसल्याचेभासवून बाजारभावापेक्षा कमी दरात विकत. महागडी दारू स्वस्त दरात मिळत असल्याने अनेकजण त्यांच्याकडून खरेदी करीत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.