नालासोपारा: आरोपीला घरात आश्रय देऊन त्याच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची सोय करणाऱ्या परिवाराला एक वेगळाच परिणाम भोगावा लागला. आरोपीने खाण्याचे वराहण्याचे पैसे दिले नाहीत म्हणून त्याला घराबाहेर काढल्यानंतर त्याच्या घराच्या बाजूलाच घर भाड्याने घेऊन राहात वडिलांसोबत दोन-तीन वेळा भांडण करून त्यांना धडा शिकवण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीसोबत कट रचून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लागण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले नादान वावगळा दान पथक नमून शताफान गुन्ह्याचा तपास करून दान्हा आरापानाअटककला. वसइ पूवकडाल रिचर्ड कंपाऊंडमधील यादव डेरी जवळाल कलाश चाळात ताजेश्वरकुमार हिरालाल गौतम(२७) हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांनी आरोपी जंगीलाल नंदलाल हरिजन (२३) याला आपल्या घरात राहण्याची वखाण्याची सोय करून पेईंगगेस्ट म्हणून ठेवले होते. पण त्याने २ ते ३ महिन्याचे खानावळ आणि राहण्याच्या भाडयाचे पैसे दिले नाही म्हणून जाब विचारला. या वेळी झालेल्या भांडणानंतर त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. जंगीलाल यानंतर त्याचचाळीत राहणारा वओळखीचा दसराआरोपी इम्रान याच्या घरी राहायला गेला. त्याचे त्यानंतर २-३ वेळा गौतम यांच्यासोबत भांडण झाले होते. घरातन काढलेला आणि भांडण केल्याचा राग मनात धरलेला आरोपी जंगीलाल याने ढमान सोबत मिळन गौतम यालाधडा शिकण्यासाठी त्याच्या मलाच्या हत्येचा कट आखला.
गौतम यांचा चार वर्षांचा मलगा शैलेश गौतम हा २ डिसेंबर रो खेळत होता. पण तो घरी परतलाच नसल्याने आजबाजला व सर्वत्र त्याचा शोध घेतला गेला. पण तो सापडलाच नाही. त्याला कणीतरी फसलावन किंवा कोणते तरी आमिष दाखवन पळवन नेल्याची तक्रार घरच्यांनी दसऱ्या दिवशी वालीव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी मलाचा फोटो आणि माहिती व्हॉटसअपया सोशल मीडियावर आणि पत्रकारांना वर्तमानपत्रात प्रसारित करण्यासाठी देऊन सगळीकडे जोरदार तपासाची चक्रे सुरू केली. पण ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पडक्या घरात लहान मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी पोहचले. त्या मृतदेहाची ओळख पटवून तो शैलेशचा असल्याचा घरच्यांनी स्पष्ट केले. त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवल्यानंतर हत्येचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. या हत्येप्रकरणी घरच्यांनी ४-५ संशयितांची नावे पोलिसांना सांगितल्यावर जंगीलालआणि एका इसमावर संशय आल्यावर त्याला कंपनीतून उचलून आणत त्याची चौकशी केलीअसताजंगीलाल राहात असल्याचा पत्ता त्याने पोलिसांना दिला. वालीव पोलिसांनी नालासोपारा पूर्वेकडील वाकनपाडा येथील राहत्या घरात धाड मारून घराची झडती घेत ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली तरी काहीही बोलण्यास तयार नव्हता. इम्रानबाबत सांग तुला सोडून देण्यात येईल असे बोलल्यावर मोबाईल नंबर दिला, पण फोन बंद होता.
त्याचे लोकेशन वडाळा येथे सापडल्यावर एकटीम त्या ठिकाणी रवाना झाली. दरम्यान, नालासोपारा पश्चिमेकडील परिसरात राहत असलेल्या इम्रानच्या घरी पोलिसांची एकटीम घेऊन जंगीलाल गेला. पण तो तिथे सापडला नाही म्हणून तेथेही त्याच्या घरच्यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन इम्रानचा दुसरा मोबाईल नंबर मिळवत त्याचे लिव्हिंग सर्टिफिकेटही मिळवले. दुसऱ्या मोबाईल नंबरचे लोकेशन वडाळा येथे आल्याने तो त्याच्या मँगलोर येथील वेलूर गावी तर पळून जात नाही ना म्हणून या नावाने ट्रेनचे तिकीट बुक घेण्यासाठी रेल्वे पोलिसांची मदत घेतली. पण त्या नावाचे बकिंग नसल्याने साधे व जनरल तिकीट काढले असावे या संशयाने दुसऱ्या टीमला का टर्मिनस येथन सटणारी ट्रेनचेक करायला सांगितले. पण तो त्या ठिकाणीही सापडला नाही. नंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणाहून सुटणाऱ्या गाड्या चेक केल्या, पण त्या ठिकाणी तो सापडला नसल्याने तो मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले होते