त्या गलिच्छ व्हिडीओत दिसणारा पाय कोणाचा ! तर तो व्हिडीओ व्हायरल करण्या पाठीमागे हात कोणाचा ?

त्या गलिच्छ व्हिडीओत दिसणारा पाय कोणाचा तर , तो व्हिडीओ व्हायरल करण्या पाठीमागे हात कोणाचा ?


संपूर्ण देशात भाजपा नेत्यांच्याआपत्तीजनक कर्माच्या घटना उघड होतअसतांनाच मीरा भाईंदर चे माजी आमदार एक हाती सत्ता चालवणारे नरेंद्र मेहता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि शहरात खळबळ उडाली असून शहरभर चर्चेला उधाण आले आहे.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार म्हणून ओळखले जाणारे नरेंद्र मेहता यांचा राजकीय प्रवास हा नगरसेवक, महापौर ते  आमदार असा आहे कमी अवधीत आपले राजकीय प्रस्थ निर्माण करणारे आणि महानगर पालिकेची सत्ता एक हाती चालवणारे मेहता हे अचानक एकाएकी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून भाजपा च्या असलेल्या पदांचा राजीनामा देतात आणि राजकीय संन्यास घेतात तेही अचानक पणे त्यामुळे मीरा भाईंदर मध्ये चर्चेचा विषय झाला असतानाच आणि 
एकीकडे मीरा भाईंदर मनपा च्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक ची रणधुमळीसुरु आणि नगरसेवकांची गुप्त पद्धतीने फोडाफोडी करून महापौर व उपमहापौर पदांची खुर्ची खेचण्यासाठी राजकीय पक्ष तयारी करत असतानाच बीजेपी ची एकहाती सत्ता असलेल्या मीरा भाईंदर महानगर पालिकेत बीजेपी अंतर्गत  सुरू असलेला संघर्ष  हा भाजपला  सत्ते बाहेर ठेवणार असे चित्र निर्माण झाले असतांनाच हवेच्या वेगाने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ ने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत .



मीरा-भाईंदर मधल्या राजकारणाला काय म्हणावे गलिछ् प्रवृत्तीने एकीकडे कळस घातलेला दिसतो तर दुसरीकडे तृष्णा, तिरस्कार आणि भय ही वृत्ती वाढलेली दिसतेआहे.
सोशल मीडियावर माजी आमदारांचा आपत्तीजनक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाल्यामुळे शहरात चर्चेचे पेव फुटलेआहे.  त्या व्हिडिओत एका महिलेचा पाय दिसत आहे. तर एकीकडे नरेंद्र मेहता फोनवर बोलतांना दिसत आहेत. व्हिडीओ हा नरेंद्र मेहता बसलेल्या समोरच्या दिशेने काढला गेला असून त्यात महिलेचा पाय ही आलेला आहे त्यामुळे शहरात चर्चा सुरू झाली तर हा पाय  नक्की  कोणाचा आणि हे गलिच्छ प्रकरण वायरल करण्या पाठीमागे हात कोणाचा ही चर्चा शहरभर रंगली आहे 
भाजपा ला मीरा भाईंदर मध्ये वाढवण्यात नरेंद्र मेहातांचा मोठा वाटा आहे साध्यातरीं मिराभाईंदर च्या राजकारणातले चाणक्य समजले जाणारे माजी आमदार नरेंद्र मेहतां यांचा पांढऱ्या रंगाच्या टॉवेल वरच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओने शहरात खळबळ उडवून दिली आहे.