ठेकेदार करतोय ट्रॉफीक वार्डन कामगारांची अर्थिक पिळवणूक

 


महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची अनदेखी 


राजकारणी व सत्ताधारी यांची अनास्था


ठेकेदारी पद्धतीने चालणारे अनेक व्यवसाय असो शासनाच्या योजना असो यामध्ये ठेकेदार कामगारांचे शोषण करून गडगंज होतात हा आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे त्याचाच कित्ता मीरा-भाईंदर मधल्या वार्डन सेवेच्या ठेकेदारांनी गिरवला आहे.


मीरा-भाईंदर शहरामध्ये वाढती लोकसंख्या त्याचबरोबर वाढते वाहनांचे प्रमाण अरुदंअसलेली रस्ते आणि त्यावर होणारी वाहतूक कोंडी या पासून शहरातल्या नागरिकांना दिलासा मिळावा यादृष्टीने ट्रॉफीक वॉर्डन (वाहतूक पोलीस मदतनिस )ची निर्मिती शहरात करून शहरातल्या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना कमी करण्याच्या दृष्टीने या वार्डन चीनिर्मिती केली गेली आहे. पण हे वाहतूक पोलीस मदतनिस (वार्डन) हे वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम सोडून अधिकाऱ्यांसाठीच काम करतात असे आरोप सुरेश खंडेलवाल यांनी लावले आहेत तर वार्डन हे वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून व त्यांच्या मदतीने वार्डन हे वसुली करता असे  आरोप जनतेतून लावले जात आहेत यामुळे वार्डन च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . 
तर एकीकडे वार्डन चा ठेका घेतलेले ठेकेदार मात्र या वार्डन म्हणून काम करणाऱ्या वेक्तीना पुरेसा पगार देताना दिसत नाहीत 10 ते 12 हजारावर महिनाभर त्याच्या कडून 12 तास काम करून घेतले जाते यामुळे पिळवणूक मात्र गरिबांचीच होते असे अनेक वाडर्न बोलून दाखवत आहेत  
ठेकेदार आणि अधिकारी यांचे संगनमत असते त्यामुळे ठेकेदार बिनधास्त असतात.  अधिकारी वर्ग या ठेकेदारांकडे कानाडोळा करतांना दिसतात . त्यामुळे ठेकेदारांकडून नेहमीच काम करणाऱ्यांची पिळवणूक केली जाते असे अनेक जाणकारांना वाटते आहे. 
महानगर पालिकेकडून ठेकेदाराला देण्यात आलेला वार्डन चा ठेका आणि एका वार्डन च्या पाठीमागे प्रत्येक दिवसा साठी त्या ठेकेदाराला 1030 रुपये  महानगर पालिका देते म्हणजे महिन्याचा 30 दिवसाचा पगार जर बघितला तर 30300 असायला हवा पण त्याऐवजी 10 ते 12 हजारावर वार्डन कडून काम करून घेतले जाते हे वास्तवा कडे नेते मंडळी पाहात नाहीत त्यावर आवाज उठवला जात नाही या मुळे त्यांची दिवसेंदिवस पिळवणूक होत आहे असे अनेक ट्रॉफीक वार्डन कडून भावना व्यक्त केल्या जात आहेत.