शिवसेनेचे 2 व काँग्रेस 1 नगरसेवक गायप
मिरा भाईंदर महानगरपालिका महापौर उपमहापौर पदाची निवडणूक काही तासांवर आलेली असतांना 3 नगरसेवक गायप असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना व काँग्रेस च्या नेत्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घातल्याचे चित्र आहे.
मिराभाईंदर महानगरपालिका महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे याच काळात नगरसेवक पळावा पळवी सुरू झाली आहे 3 नगरसेवक गायप झाल्यामुळे महाविकास आघाडी मध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेनेचे 2 नगरसेवक गायप झाल्याची तक्रार घेऊन खासदार राजन विचारे, पालकमंत्री एकनाथ शिंदे,आमदार प्रताप सरनाईक तर काँग्रेस पक्षाचे 1 नगरसेवक गायप असल्याची माहिती मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र कर्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन हे गायप असलेल्या नगरसेवकांना शोधण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबाव बनवण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे .
महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकी साठी काही तास शिल्लक असतांना शिवसेनेच्या अनिता पाटील व दीप्ती भट्ट तर काँग्रेस च्या अक्ररम मेराज हे गायप असल्याची माहिती मिळताच महाविकास आघाडीत गोंधळ उडाला आहे .अशीही माहिती समोर येत आहे की जर हे तीन नगरसेवक जर मिळून नाही आले तर 26 तारखेला मीरा भाईंदर महाविकास आघाडीकडून बंद केले जाईल.
आजी व माजी आमदारांमधला वाद आणि अंतर्गत असलेली गटबाजीमुळे परेशान असलेले नगरसेवक आहेत . भाजपा च्या अंतर्गत वादामुळे क्रॉस मतदान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याचाच फायदा होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना महाविकास आघाडीला महापौर आणि उपमहापौर निवडणूक जिंकण्यासाठी अधिक 14 नगरसेवकांची गरज आहे आणि ती गरज चमत्कारिकरित्या भरून निघेल असा अंदाज आघाडीच्या गोटातून बांधला जात आहे . तर भाजपा कडे बहुमत असल्यामुळे आणि सावधगिरी बाळगत जवळपास 55 नगरसेवक हे सी अँड रॉक हॉटेल मध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या देखरेखीखाली ठेवले आहेत. आता हेच पाहावे लागणार आहे की या निवडणुकीत बाजी कोण मारणार भाजपा की महाविकास आघाडी .