मीरा रोड : देशातले वाढते अपघात चे प्रमाण नियंत्रणात यावे : म्हणून वाहतूक पोलीस विभागाच्या : माध्यमातून वेगवेगळ्या क्लुप्त्या : लढवून जनजागृती करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो आणि लोकांना • वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी • लोकसहभाग वाढावा या दृष्टीने रस्ता • सुरक्षा सप्ताह सारखे कार्यक्रम • आयोजित केले जातात नुकताच पार • पडलेला रस्ता सुरक्षा सप्ताह आणि : सुरक्षेतेसंदर्भात देण्यात आलेले धडे ही पोलीस खात्यातले अधिकारी जेव्हा विसरतात तेव्हा सामान्य जनतेचे काय असा प्रश्न आज घडीला पडतो आहे. पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनीही शिस्त पाळण्याबाबत आवाहन केले होते. महत्वाचे म्हणजे, पोलिसांनादेखील पत्रक काढून वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळण्यास सांगण्यात आले होते.हेल्मेट वापरा, पोलीस खात्याचा लोगो लावू नका, गाडीच्या काळ्या फिल्म काढा आदी सूचना पोलिसांनादेखील देण्यात आल्या होत्या.
या रस्ते सुरक्षा सप्ताहचे फलक अद्याप कायम असतानाच, भाईंदर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा पाटील या सोमवारी भाईंदरमध्ये दुचाकीने जात असताना विनाहेलमेट तर होत्याच, पण चक्क एका हाताने गाडी चालवत एका हाताने मोबाईलवर बोलतही होत्या.
महिला उपनिरीक्षकास बसला नागरिकांना वाहतूक नियमांचे धडे देणारे पोलीसच वाहतूक नियमांच्या चिंधड्या उडवत असल्याचे पाहून सूनिल कदम या तरुणाने त्याचे छायाचित्रण केले. याची तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच वाहतूक शाखेकडे त्यांनी केली. कदम यांच्या तक्रारीवरुन वाहतूक पोलिसांनी मनिषा पाटील यांना विनाहेल्मेटसाठी ५०० रुपये व मोबाईलवर बोलत वाहन चालवल्याबद्दल २०० रुपये असा ७०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ठाणे ग्रामीण वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी तक्रार व त्यातील छायाचित्रावरुन मनिषा पाटील यांना दंड ठोठावल्याचे सांगितले. दंड भरण्याबाबत पाटील यांना भाईंदर ठाण्याचे वरिष्ट निरीक्षक यांच्या मार्फत निरोप दिल्याचे ते म्हणाले.