भाईंदर - "जे पेरले तेच उगवते असे म्हटले वावगे ठरणार नाही. " हे त्रिकाल सत्य मीरा भाईंदर मध्ये पहायला मिळत आहे . दुसऱ्या पक्षातले नगरसेवक फोडून आपल्या पक्षात घेऊन सत्ता मिळवणारे भाजपचे नेतृत्व पुन्हा महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणूकीत फोडाफोडी होण्याची भिती निर्माण झाल्यामुळे आपल्या नगरसेवकांना दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रवानगी केली आहे .
फोडाफोडीचे राजकारण करून सत्तेत राहणारे नेते आपल्या स्वार्थासाठी खालच्या थराचे राजकारण करत असल्याचे नेहमीच पाहायला मिळत आहे. बंडखोरी , धोकेबाज वृत्ती, विकाऊ वृत्ती, स्वार्थासाठी पक्ष बदली करणारे नगरसेवक सर्वच पक्षात असतात या वृत्तीचा फटका बसू नये म्हणून नेते मंडळी नियोजन करतात धोकेबाजी च्या राजकारणामध्ये कोण कोणाला कधी धोका देईल हे सांगता येत नाही याच भीतीपोटी भाजपाने आपल्या नगरसेवकांना गोवा इथे सुरक्षित स्थळी ठेवले आहे . भाजपात निर्माण झालेली दुफळी ही मीरा भाईंदर मनपात बहुमत असलेल्या भाजपाला खिळखिळी करते की काय असे चित्र निर्माण झाले आहे . भाजपातला अंतर्गत वाद, महापौर शर्यतीतून करणार का बाद ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .
एक हाती वर्चस्व असलेल्या नरेंद्र मेहतांच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता असल्याच्या भीतीपोटी नगरसेवकांना फोडाफोडीचा, घोडेबाजारीचा कित्ता गिरवायला सुरवात झाली आहे. मेहता गटाचे ध्रुवकिशोर पाटील यांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात केलेली तक्रार याची साक्ष देत आहे. मीरा भाईंदर महानगर पालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या २६ तारखेला होत आहे. त्यानुसार निवडणुकीसाठी तापलेले राजकारण पाहता मीरा भाईंदर मधील जनतेचे लक्ष वेधून घेत आहे भाजपाचे महानगरपालिकेमध्ये स्पष्ट बहुमत असतानाही भाजपाच्या गोटात पसरलेली भिती ही येणाऱ्या काळाची पावले तर नाहीत ना ?असा प्रश्न पडतोय ९५ नगरसेवकांपैकी भाजपचे ६१ , शिवसेनेचे २२ , आणि काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत सध्याच्या महाराष्ट्र सरकारचा फार्मूला बघितला तर महाविकास आघाडीचे ३४ नगरसेवक आहेत. महाविकास आघाडीला १४ नगरसेवकांची गरज आहे. तर बहुमत असलेल्या भाजपचे ६१ नगरसेवक असतानाही भाजपाला आपले नगरसेवक फुटण्याची भीती जास्त आहे. कारण भाजपात असलेले मेहता समर्थक आणि आमदार गीता जैन समर्थक असे दोन गट आहेत. पक्षावर नाराज असलेल्या गीता जैन यांच्या गटाचा फटका भाजपा पक्षाला बसू शकतो असे अनेक जाणकारांनी मत व्यक्त केल्यामुळे मीरा भाईंदर चा महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही फोडाफोडीच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे . यामुळे आपल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी पोहोचवून त्यांचा इतर कोणत्याही नेत्याशी संबंध येऊ नये म्हणून त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर त्यांना कोणालाही भेटता येऊ नये म्हणून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे काम पक्षाचे काही पदाधिकारी करत असल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षित स्थळी नेलेल्या नगरसेवकांना सव्वीस तारखेला मतदानाच्या वेळेला आणले जाणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपातला अंतर्गत वाद, महापौर शर्यतीतून करणार का बाद ?
भाजपातला अंतर्गत वाद, महापौर शर्यतीतून करणार का बाद ?