पतीचा खून करणाऱ्या महिलेस पोलिसांनी ठोकली बेड
पर पुरुषाशी असलेले अनैतिक संबंध मनमोकळे पणे करता यावे या संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीने काटा काढल्याची तक्रार मयताच्या वडिलांनी दिल्याने मयताच्या पत्नी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नांदेड शहरातील शिवबा नगर भागात १९ फेब्रुवारी रोजी घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील शिवबा नगर भागातील यल्लाप्पा लक्ष्मण देगलूरकर (वय ३०) यांचे पत्नीशी नेहमी भांडण व्हायचे. असाच प्रकार १९ रोजी ही घडला. त्यात यल्लाप्पा देगलूरकर यांचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आपल्यावर सवंशय येऊ नये म्हणून त्याचे प्रेत जाळण्यात आले. या प्रकरणात त्याची पत्नी ज्योती यल्लाप्पा हिनेच के कृत्य केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असुन ते लपवण्यासाठी तिने माझ्या मुलाचा काटा काढल्याचा आरोप त्याच्या मयताच्या पित्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीतून केला आहे.
वडील लक्ष्मण गंगाराम देगलूरकर धानोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ज्योती यल्लाप्पा देगलूरकर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस( दि. २०) रोजी न्यायालयापुढे उभे केले असता आरोपीस २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पोलिस निरीक्षक भगवान धबडगे हे करीत आहेत.