ठाणे : मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान कळवा फाटक येथे एकूण तीन प्रवासी लोकमधून पडले. या पैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात जखमी झालेले प्रवासी मुंब्रा येथील राहणारे आहेत. लोकलमध्ये मोठी गर्दी उसळल्याने हा प्रकार घडल्याचे प्रत्यक्षदशींनी सांगितले. हे अपघात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडले. कल्याणकडून आधीच गर्दीने भरून आलेल्या लोकलमध्ये कळवा स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी चढले. मात्र, या रेटारेटीत प्रवाशी लोकलबाहेर फेकले गेले.
लोकलमधून पडून एकाचा मृत्यू