मीरारोडः मैत्री ओळखीचा गैरफायदा घेऊन तिलाभूलथापा देऊन एखाद्याच्या अब्रूचे लचके तोडून तिची मानसिक खच्चीकरण करण्याचा बेत आखणाऱ्या वृत्ती आणि त्या बेतात फसलेली पिढीता जेंव्हा आपल्यावर अत्याचार झालेला आहे
असे तिच्या लक्षात येते आणि ती आपल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पोलिसात जाऊन फिर्याद देते तेंव्हा तिच्यावती अन्याय केलेल्या गुन्हेगाराचा तीळपापड होऊन त्याचा राग अनावर होतो त्यामुळे तिच्यावर दबाव आणून गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव बनवण्यासाठी षड्यंत्र रचून तिच्या अंगावरती ज्वलनशील पदार्थ फेकन तिच्या मनात भीती तयार करून तिला गुन्हा मागे घेण्यात दबाव बनवण्यासाठी असे षड्यंत्र रचणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्यासाठा तात्काळ चक्रे फिरवत आरोपीच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दाखल झालेल्या बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने एका २६ वर्षिय पिडीत महिलेच्या अंगावर ज्लवनशील द्रव्य ओतल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाणो हद्दीत घडली आहे. पोलीसांनी तत्परता दाखवत आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपीला सोमवारी गुजरातच्या अहमदाबाद येथुन पकडुन त्याला गजाआड केले. सदर पीडित महिला आपली दोन मुलं व बहिणीची मुलं यांच्या सह राहते. शुक्रवारी रात्री पिढीत महिला मुलांचे नाश्त्याचे साहित्य व औषधे विकत घेऊन पायी घरी चालली होती. रात्री १०.३० च्या सुमारास महिला एकटीच हटकेशघोडबंदर रोड वरून अदानी पॉवर सब स्टेशनकड़न एकटीच चालली असताना या संधीचा फायदा घेत तिच्यावर पाळत ठेवून असलेला नया नगर भागात राहणारा बलात्काराच्या गन्ह्यातील आरोपी हा आपल्या मित्रासोबत दुचाकीने आला.
तिला रस्त्यामध्ये अडवून त्या दोघांनीही तीला धमकावत सांगीतले की, काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घे. तसे स्टॅम्प पेपर लिहुन दे अशी जबरदस्ती करत असताना त्या दोघांनाही पिडीत महिलेने साफ स्पष्ठपणे नकार दिला. स्टॅम्प पेपर सही कर असे धमकावले परंतु तीने सही करण्यास व केस मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीचा तिळपापड झाला. आणि या या गोष्टीचा त्याच्या मनात हा निर्माण झाली मी पाहन घेईन असे सांगत तीला धामकावले. तीआपल्या घराच्या दिशेने जाऊ लागली असताना एकाने तीच्या अंगावर हातातली ज्वालाग्रही द्र द्रव्याने भरलेली बाटली फोडली. तेव्हा तिने घाबरलेल्या स्थितीत असतानासुद्धाआरडाआरडा केल्याने तदार हल्लखार हाटकश ते दोघे हल्लेखोर हाटकेशच्या दिशेने पळुन गेले. त्या बाटलीत पेट्रोल व रॉकले सारखे ज्वालाग्रही रसायन असल्याने ते तीच्या अंगावर पडुन डोळ्यात गेल्यामुळे खुपच जळजळ होऊ लागली. त्या रस्त्यावरून येणाऱ्या एका तरुणाने तीला मदत केली आणि तिला काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. पोलीसांनी उपचारासाठी भाईंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी देखील पेट्रोल वा रॉकेल सारखे ज्वलनशील रसायन असल्याचे म्हटले आहे. दरम्यान या घटनेची पोलीसांनी गांभीर्याने दखल घेतली. आणि आपल्या तपासाचे चक्र गतीमान करत वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी आरोपीला अटक करण्यासाठी तातडीने तपास सुरु करुन पथके रवाना केली. यातील महिलेच्या फिर्यादी वरुन बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला मख्या आरोपी दा गुजरातच्या अहमदाबाद येथे असल्याचे कळताच पोलीसांनी त्याला तेथुन सोमवारी पकडुन आणले. मंगळवारी त्याला ठाणोन्यायालयात हजर करण्यात आले. उपनिरीक्षक अमित पाटील पुढिल तपास करत आहेत.