तीन दहशतवादी ठार


 जम्मू- घुसखोरी  करून आतंकी दहशत निर्माण करणाऱ्या आतंकवाद्यांना ठार मारण्यात भारतीय जवानांना यश आले आहे 


काश्मीरमधील पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलाला मंगळवारी रात्री उशिरा तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख जंजीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि अमीन भट अशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते स्थानिक दहशतवादी असल्याचे बोलले जात आहे. दहशतवाद्यांकडून एके-४७, एके-५६, पिस्टल आणि हँड-ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.
मंगळवारी रात्री उशिरा जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सेनेच्या संयुक्त टीमकडून ही कारवाई करण्यात आली. त्रालमध्ये दहशतवाद्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना घेराव घातला होता. त्यानंतर चकमक सुरु झाली. हे तीनही दहशतवादी 'अंसार गजवा उल हिंद' या संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे.दहशतवाद्यांकडून हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांचे महनिरीक्षक विजय कुमार यांनी सांगतिले.