नवनिर्वाचित महापौरांची महापुरुषांच्या प्रति अनास्था महापुरुषांचा केला अपमान
मीरा भाईंदर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज दिनांक 26/ 2 /2020 रोजी सकाळी पार पडली . महाविकासआघाडीच्या उमेदवारांचा पराभव करत भाजपाने बाजी मारली आणि पुन्हा मनपाच्या सत्तेवर ताबा मिळवला आहे . महापौर म्हणून ज्योस्तना हसनाळे तर उपमहापौर म्हणून हसमुख गेहलोत हे विजयी ठरले आहेत.
महानगरपालिकेच्या गेटजवळ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती आणि महापौर , उपमहापौर पदाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल-ताशे वाजवून नाचत पेढे भरवत आनंद व्यक्त करत होते नवनिर्वाचित महापौरांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारणी ज्योस्तना हसनाळे यांना घेरले आणि त्यांची प्रतिक्रिया घेतली. पत्रकारांना प्रतिक्रिया दिल्यानंतर गळ्यातला हार काढून हातात घेऊन त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या अर्धाकृती पुतळा कडे गेल्या तोच हार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अर्पण केला .
मनपा कार्यलयाच्या गेट च्या बाजूलाच अर्ध्या मिनिटांच्या अंतरावर फुल हारांची दुकाने आहेत. हजारो रुपयांची उधळपट्टी ढोल ,तासे, मिठाई खर्च करणाऱ्या महापौरांना साधे दोन पुष्पहार विकत घेऊन महापुरुषांना वंदन करावे असे वाटले नाही ही खेद जनक बाब आहे.
कार्यकर्त्यांनी स्वागत केलेला पुष्पहार गळ्यात घालून पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आणि तोच हार गळ्यातून काढून पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अर्पण केला. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या फुलांच्या झाडांची दोन फुले तोडून डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वाहिली . कार्यकर्त्यांनी स्वागत केलेला व गळ्यात टाकलेला हार गळ्यातुन काढून डॉ बाबासाहेबांच्या अर्धकृती पुतळ्यास घातल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या अनेक प्रत्यक्षदर्शींनी नाराजगी व्यक्त केली नवनिर्वाचित अनुभवी व सुशिक्षित महापौरांकडून अशी अपेक्षा नव्हती असे अनेकजण बोलून दाखवत होते . हा तर महापुरुषांचा एक प्रकारचा अपमान आहे अशी भावना व्यक्त केली जात होती . त्याचबरोबर मनपात प्रवेश द्वाराच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा आहे ह्या पुतळ्यास हार अर्पण केलाच नाही त्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या फुलझाडांची दोन फुले तोडून तिच फुले अर्पण गेली. यामुळे महापौरांच्या या कृत्याने महामानवांच्या प्रति असलेली अनस्थ दिसून आली खरंतर ज्योस्तना हसनाळे ह्या चार वेळा नगरसेविका म्हणून निवडून येऊन महानगरपालिकेच्या सभागृहात गेलेल्या अनुभवी नगरसेविका आहेत. त्या शिक्षण सभापती राहिल्या आहेत त्याचबरोबर त्या उच्चशिक्षित असूनही त्यांच्याकडून असे कृत्य करणे म्हणजे एका अडाणी पणाचे लक्षण होय. आज त्यांना मिळालेला मानसन्मान हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना मुळे ही संधी मिळालीआहे . गावकुसाबाहेर राहिलेल्या समाजातील वेक्तीला माणूस बनवण्याचे काम संविधानाने केले आहे तर आज या शहराचा प्रथम नागरिक बनता आले ते एकमेव संविधानामुळे शक्य झाले . त्या संविधान निर्मात्याप्रति अशी अनास्था दाखवणे म्हणजे अडाणी पणा नाही तर काय म्हणावे अशी प्रतिक्रिया जनतेतून येऊ लागली आहे .या कृत्यांच्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून फोन उचलला गेला नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया याठिकाणी घेता आली नाही
या घडलेल्या प्रकारा बाबत वरिष्ठ पत्रकार धीरज परब यांची खाली दिलेली बोलकी प्रतिक्रिया :
लोकप्रतिनिधी आणि राजकारणी हे निव्वळ स्वार्थ साठी महापुरुषांचा कसा वापर करत असतात आणि त्यांना या महापुरुषां बद्दल मनापासून किती आदर हे हेच यातून स्पष्ट होते. ज्यांनी समाजाला दिशा दाखवली त्यांच्या आदर्शांवर चालणे तर आजच्या लोकप्रतिनिधी व राजकारण्यांनी सोडूनच दिले आहे. सत्ता, संपत्ती कशाही प्रकारे कमावणे हाच या लोकांचा आदर्श बनला आहे.
वास्तविक नवनिर्वाचित महापौरांना पद मिळाले आहे तेच मुळात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मिळाले आहे. नाहीतर भाजपचे स्थानिक सर्वेसर्वा नरेंद्र मेहतांनी कदापि ज्योत्स्ना हसनाळे यांना महापौर पद दिले नसते हे वास्तव आहे.
महापौर झालात त्याचा आनंद साजरा करताना तुम्ही मिठाईचे खोकेच्या खोके आणू शकता. मात्र युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अर्पण करण्यासाठी मात्र विकतचा साधा फुलांचा हार आणू शकत नाही यातून महापुरुषांच्या बद्दलची आत्मीयता व आदर काय आहे तो दिसून येतो. महापौर ह्या स्वतः शिक्षिका आहेत व सुज्ञ आहेत. जो प्रकार घडला तो त्यांच्या कडून नकळत व महापौर झाल्याच्या उत्साहात अनावधानाने घडला असावा असे वाटते. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच आदर्श व दैवत आहेत. त्यांनी कधी जाती धर्माच्या आधारे राज्य चालवले नाही वा भेदभाव केला नाही. ते रयतेचे व स्वराज्याचे खरे छत्रपती होते व राहतील. त्या मुळे त्यांना जाती - धर्मभेदात अडकवणे योग्य नाही.