कायदेशीर रित्या परवानगी घेऊन चौकसभा करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या कर्यांकर्त्यावर भाजपा कार्यकर्त्याकडून जीव घेणा हल्ला केल्याने शहरात कायद्याचे राज्य आहे की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे .शहरातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे .
संविधान बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून भाईंदर पश्चिम येते दिनांक 23/ 2 /2019 रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान कम्युनिष्ठ पक्षाचे कार्यकर्ते ऍड. किशोर सामंत अत्ताउल्ला खान ,आलोक गुप्ता, मोईन अन्सारी ,श्रीनिवास सामंत सह तीन कार्यकर्ते एनआरसी सिएए एनपीआर कायद्या विरोधात चौकसभा करत असताना यांच्यावरती भाजपाच्या कार्यकर्त्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्याच बरोबर त्यांच्या सामानाची तोडफोड करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केली आहे ही चौकसभा उजळून लावण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला आहे. हा हल्ला करणाऱ्यांमध्ये तीन वेक्तीचे नावं समोर येत आहे गुड्डू वर्मा ,त्याचा भाऊ सड्डू वर्मा आणि त्यांचा एक साथीदार असून गुड्डू या कार्यकर्त्यांवर या पूर्वी ही अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलीसानी प्रतिबंधकात्मक कारवाई म्हणून अटक करणे गरजेचे होते पण आरोपींना अत्तापर्येंत अटक केली नाही यामुळे घटनेचा मीरा-भाईंदर मधल्या सुज्ञ नागरिकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
भारतीय दंड संहिता कलम 352 323 504 506 34 34 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत.