सनसिटी बारवर पोलिसांचा छापा सनसिटी


___ मीरारोउ । लागून असलेले मीरा भाईंदर शहर आणि शहरामध्ये वाढत चाललेले डान्सबार शहराची नाचकी करणारे आहेत. ऑर्केस्ट्राच्या नावावर चालणारे हे डान्सबार अनैतिक व्यवसायाची गुफा बनलेली आहेत.मध्य रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहेत. मुंबई अहमदाबाद हायवे लगत अनेक डान्सबार आहेत, काशिमीरा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत बारमाफियांचा धंदा वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे हे बार माफिया ना कायद्याला घाबरत आहेत, ना पोलिसांना घाबरत आहेत. बारमाफियांची मनमानी आणि दादागिरी वाढल्याचे चित्र जाणवते आहे. कायद्याच्या चिंधड्या उडवत अनेक ऑकेस्ट्राच्या नावावर चालणाऱ्या बारमध्ये अश्लीलतेचा बाजारभरलेला असतो आणि अश्लील नृत्य करुन ग्राहकांना लुभावून अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. डान्सबारच्या बाजूलाच अनेक लॉजिंग उभ्या आहेत लॉजिंगचा वापर सर्रासपणे अनैतिक धंद्यासाठी केला जातो. अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. मंगळवारी रात्रीच्या वेळी ऑर्केस्ट्राबारमध्ये गायिकेच्या नावाखाली अनेक मुली बारमध्ये ठेवल्या जातात. त्याचप्रकारची करनी सनसिटी बारच्या संचालकांनी केली होती. गायिकेपेक्षाअधिकमली बारमध्ये ठेवल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर बारवर पोलिसांचा छापेमारी करून २६बारबालांना आणि ३३ ग्राहकांना व बार चालक व त्या ठिकाणी असलेला स्टाफ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह मध्यपान कक्षामध्ये अश्लील नृत्य प्रतिबंध करणे आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम २०१६ च्या कलम ३, ८(१) ,८ (२)अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . दोडिया पेट्रोल पंप जवळील सनसिटी ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी पोलिसांना मार्यादापेक्षा अधिक मुली बारमध्ये मिळून आल्या. त्याचबरोबर अनेक मुली अश्लील डान्स करताना सुद्धा मिळून आल्या अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे मुलींना ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्य करुन अश्लील चाळे केले जात होते. काही दिवसांपूर्वी, बार मध्ये काम करणाऱ्या मुलींची ओळख पटविण्यासाठी पोलीस पोलिसांचा छापा निरीक्षकानीं पाई परेड करत पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांचा परिणाम असा झाला की त्या निरीक्षकांची बदली झाली. त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायद्याला धाब्यावर बसवत बार माफियांनीआपला व्यवसाय जोमाने सुरू केला आहे, अनेक बार माफियांनी बारबालांना लपवण्यासाठी गुप्त ठिकाणी रुम बनवलेले आहेत. यामध्ये या बारबालांना लपवले जाते अशा अनेक छप्या खोल्यावरती काशिमीरा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अनेक वेळा छापा टाकून या मुलींना घाणीतून बाहेर काढले आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी डान्स बार मालकाद्वारे नाईटलाइफ बार वर छापा हा पोलिस उपअधीक्षक शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमुळे बार माफिया आणि लॉजिंग बोडिंग डान्स बार ऑर्केस्ट्रा बारचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.