भाजपा च्या हसनाळे बनल्या नवं महापौर तर उपमहापौर पदाची हसमुख गेहलोत यांच्या गळ्यात माळ

भाजपा च्या हसनाळे बनल्या नवीन महापौर तर उपमहापौरांची माळ हसमुख गेहलोत यांच्या गळ्यात


मिराभाईंदरमहानगर पालिकेची सत्ता अपेक्षेप्रमाणे भाजपने महाविकास आघाडी ला पराजित करून सत्ता आपल्या ताब्यात  ठेवण्यात भाजपला अखेर यश मिळालेआहे.


मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा अडीच वर्षाचा  कार्यकाल 27 फेब्रुवारी रोजी समाप्त होत आहे. त्यापूर्वी अडीच वर्षा साठी नवीन महापौर निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेचे महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव होते तर उपमहापौर हे सामान्य प्रवर्गासाठी  या निवडणुकीत ऐकून 95 नगरसेवका पैकी 91 नगरसेवकांनी  सहभाग नोंदवला आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. 


या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्हा जिल्हाधिकारी  मिलींद बोरकर हे होते. त्यानुसार आज 26 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11: 45 वाजता सुरू झाली आणि मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 2005 च्या कायद्या प्रमाणे पार पडली असून  महापौर पदाचे महाविकासआघाडी चे उमेदवार अनंत गेनू शिर्के यांना 36 मते तर भाजपा च्या उमेदवार जोस्ना हसनाळे यांना 55 मते मिळाले . जोस्ना हसनाळे या महापौर पदाच्या निवडणूकित विजयी झाल्या आहेत.


 उपमहापौर पदासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार मर्लिन डीसा यांना ऐकून  35 मते तर भाजपा चे उमेदवार हसमुख गेहलोत यांना ऐकून 56 मते मिळाले आहेत . उपमहापौर म्हणून गेहलोत हे विजयी झाले आहेत. तर मिराभाईंदरमहानगर पालिकेची सत्ता अपेक्षेप्रमाणे भाजपने महाविकास आघाडी ला पराजित करून महानगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात  ठेवण्यात भाजपला अखेर यश मिळालेआहे.