प्रियकरच तिचा कर्दनकाळ  ठरला ,  उपचारादरम्यान  तिने प्राण सोडला


भाईंदर - प्रेम हे आंधळं असतं , त्याला जात, धर्म, पंथ, वय याची मर्यादा आड येत नाही असे म्हटले जाते . पण  प्रेमाच्या आड  वासना लपलेली असते  तेंव्हा त्या प्रेमाचा अंत वाईट होतो  अशीच घटना भाईंदर शहरात घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे 


भाईंदर पूर्व नवघरगावं येथील रमेश नगर मध्ये सतीमा महंतो दास यांच्या घरावर  काळाची नजर पडली आणि ज्याच्यावर प्रेम केले तोच प्रियकर तिच्या जीवावर उठला . मृतक आणि तिचा प्रियकर हे  गेल्या काही महिन्या पासून एकत्र राहत होते . अनेक दिवस हाशी खुशी गेले पण मंगळवार ची मध्यरात्र मात्र तिच्या साठी काळ घेऊन आलेली काळरात्र ठरली . सतीमा हिचा मामे बहिणीचा मुलगा मुंबईला सतीमा कडे राहला येणार  होता पण तो इथे येणे हे आरोपी मुर्शीद उर्फ मुन्ना दिनअल्ली ला हे मान्य नव्हते .  त्यामुळे दोघांत वाद सुरू झाले हे छोटेसे कारण ठरलेल्या वादाने पेट घेतला अणि त्याच  रागाच्या भरात तिच्या प्रियकराने घरातील चाकू घेऊन तिच्यावर खुनी हल्ला केला . आपल्याच प्रेयसीवर चाकू चे सपासप अनेक वार केले. सतीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिला जखमी अवस्थेत उपचारासाठी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . बुधवारी सतीमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून  नवघर पोलिसांनी पोलीस ठाण्यात इंडीयन पिनल कोड  कलम ३०३,३०७  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर पुढील तपास नवघर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरिक्षक देवरे करत आहेत. आरोपी हा बांगलादेशी असल्याची माहिती ऐकायला मिळत आहे पण आतापर्यंत त्यास दुजोरा मिळालेला नाही.