महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा कार्यकाल 27 फेब्रुवारी रोजी समाप्त होत आहे त्यापूर्वी नवीन महापौर निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे त्यानुसार 26 फेब्रुवारी ला नवीन महापौरांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे महापौर पदे अनुसूचित जाती साठी राखीव झाले असून या पदाच्या शर्यतीत मीरा-भाईंदर मधले चार उमेदवार स्पर्धेत आहेत त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आणि शिवसेनेचा एक असे असून अर्ज भरण्याची तारीख 20 फेब्रुवारीला पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी मिलिंद बोरकर हे असणार आहे भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता असलेल्या मिरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये एकूण सदस्य 95 असून त्यामध्ये बीजेपी चे 61 शिवसेना 22 आणि काँग्रेस 12 असे बाहुबल आहे आता हे पहावे लागणार आहे फोडाफोडीच्या राजकारणामध्ये महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार