राजकारणात नेतेगिरीचा छंद जोपासणारे नेते उदयास आल्यामुळे राजकारणाशी जोडलेली समाजसेवेची नाळ कुठेतरी दुरावत असतांना दिसत आहे. ऐसी टक्के समाजकारण ववीस टक्के राजकारण म्हणत राजकारणाची पायरी चढणारे तळागाळाची नाळ जुडलेले नेते न राहिल्यामुळे अनेक पक्षांच्या कुबड्या ढिल्या होत आहेत. पक्षश्रेष्ठींशी गुलामगिरी पत्करुन आपली जागा रिजर्व रहावी यासाठी काम करणारे पण जनतेची नाळ चुकलेले नेते सगळ्यात पक्षात मिरवताना दिसत आहे. तिथे बोलघेवड्या नेत्यांची गर्दी वाढली असून, जनतेमध्ये जाऊन पक्षाला शक्ती देऊ शकणाऱ्यांची संख्या घटलेली आहे. काँग्रेससारखा देशव्यापी पक्ष म्हणून इतका डबघाईला आलेला आहे. कारण, त्या पक्षाचे श्रेष्ठी वा हायकमांड म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेमधून निवडून येणेही शक्य राहिलेले नाही. कपिल सिब्बल, चिदम्बरम, राजीव शुक्लाअशा नेत्यांना जनतेत स्थान नाही; पण त्यांचा बोजा खऱ्याखुऱ्या कार्यकर्त्यांना उचलावा लागतो. बदल्यात खरे कर्तबगार नेते मागे पडतात. ही अर्थात एकट्या काँग्रेसची अवस्था नाही. तर अनेक लहान-मोठे पक्ष तसेच डबघाईला आलेले आहेत. उत्तर प्रदेशातील मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष, बिहारच्या लालूंचा राष्ट्रीय जनता दल, कर्नाटकातील देवेगौडांचा निधर्मी जनता दल,असे अनेक पक्ष आहेत. नेत्याशी जवळीक साधून हे बांडगुळासारखे नेते पक्षाचे शोषण करीत असतात आणि जनतेत जाऊन पक्षासाठी राबणारे वनवासात खितपत पडलेले असतात. साहजिकच, पक्षाची आबाळ सुरू झाली, की मग या बांडगुळांना बाजूला करण्याची हिंमत दाखवू शकणारा नेताच पक्षाची डुबती नौका वादळातून बाहेर काढू शकत असतो आणि ती हिंमत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दाखवलेली आहे. ज्या आक्रमकपणे त्यांनी पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते खड्यासारखे बाजूला केले, त्याची मीमांसा करताना ही बाब विसरून चालणार नाही. त्यापैकी एक आहेत निवडणुका जिंकून देण्याची किमया करणारा तंत्रज्ञ प्रशांत किशोर आणि दुसरे आहेत, परराष्ट्र धोरणातले बुद्धिजीवी जाणकार पवन वर्मा. या दोन्ही नेत्यांनी अलीकडल्या काळात नितीश यांच्याशी जाहीर मतभेद व्यक्त केले होते आणि म्हणूनच तडकाफडकी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तो त्यांच्यावर झालेला अन्याय म्हणायचा, की पक्षालाच दिलेला न्याय म्हणायचा? की केवळ आपल्या व्यक्तिगत भांडणामुळे नितीशनी केलेली ही सूडबुद्धीची कारवाई म्हणायची? वरकरणी बघितल्यास त्याला सुडाचीच कारवाई म्हणता येईल किंवा नितीश यांची पक्षातली हुकूमशाहीच म्हणावे लागेल; पण वास्तव तसेच आहे काय? कुठलाही पक्ष वा संघटना एका ठरावीक हेतूने वा राजकीय उद्दिष्टासाठी स्थापन झालेली असते. नितीशकुमारचा संयुक्त जनता दल नावाचा पक्षही त्याला अपवाद नाही. १९९५ नंतरच्या काळात बिहारमधील जनता दलामध्ये फाटाफूट झाली. कारण, तिथे जनता दल या पक्षाला मुख्यमंत्री लालूप्रसाद यांनी आपली कौटुंबिक मालमत्ता करून टाकलेले होते. त्याला आक्षेप घेणाऱ्यांना खड्यासा होते आणि प्रसंगी मुस्कटदाबी करूनही संपवले जात होते. तेव्हा लालूंच्या दडपशाहीला आव्हान देण्यासाठी जे मोजके नेते पुढे सरसावले, त्यात नितीशकुमार एक होते. जॉर्ज फर्नाडिस व अन्य काही समाजवादी विचारांच्या नेत्यांनी मिळून समता पार्टी नावाने वेगळी चूल मांडली, तोच आता संयुक्त जनता दल किवा जदयु म्हणून ओळखला जाणारा पक्ष आहे. त्यांनी लालूंचे आव्हान पेलण्यासाठी वैचारिक मतभेद असूनही भाजपशी हातमिळवणी केली आणि ती आघाडी दीर्घ काळ चालू राहिली. फर्नाडिस प्रकृतीमुळे गामासातेवानलालनात नेत्यांनी मिळून समता पार्टी नावाने वेगळी चूल मांडली, तोच आता संयुक्त जनता दल किवा जदयु म्हणून ओळखला जाणारा पक्ष आहे. त्यांनी लालूंचे आव्हान पेलण्यासाठी वैचारिक मतभेद असूनही भाजपशी हातमिळवणी केली आणि ती आघाडी दीर्घ काळ चालू राहिली. फर्नाडिस प्रकृतीमुळे अस्तंगत होत असताना नितीशकुमार नेता म्हणून उदयास आले आणि हळूहळू त्यांनीच पक्षामध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित केले. त्यांना भाजपची योग्य साथ मिळाली आणि उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी ख्यातीही प्राप्त केली; मात्र सात वर्षांपूर्वी भाजपच्या नेतृत्वात आमूलाग्र बदल होत असताना नितीश वेगळे झाले. त्यांनी एनडीए सोडली. त्याचा खरा सूत्रधार पवन वर्मा होते. आयुष्यभर भारत सरकारच्या परराष्ट्र खात्यात सेवा करून निवृत्ती पत्करल्यावर राजकारणात आलेल्या वर्मा, यांनीच नितीशना भाजपची साथ सोडायला भाग पाडले. पुढे जदयुलाअखेरीसअस्तित्व टिकवण्यासाठी त्याच लालूंना शरण जावे लागले, ज्यांच्या दडपशाही विरोधात त्या पक्षाची स्थापना झालेली होती. तिथून नितीशना एकामागून एक शरणागती पत्कराव्या लागल्या. त्यातून सावरताना त्यांना प्रशांत किशोर यांनी मदतीचा हात दिला. २०१४ च्या लोकसभेत दणदणीत पराभव झालेल्या नितीशना लालूंच्या दावणीला बांधून मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी प्रशांतने मदत केली होती. म्हणूनच, पुढे त्यांना पक्षात घेऊन नितीश यांनी उपाध्यक्ष केले होते. पत्करल्यावर राजकारणात आलेल्या वर्मा, यांनीच नितीशना भाजपची साथ सोडायला भाग पाडले. पुढे जदयुलाअखेरीसअस्तित्व टिकवण्यासाठी त्याच लालूंना शरण जावे लागले, ज्यांच्या दडपशाही विरोधात त्या पक्षाची स्थापना झालेली होती. तिथून नितीशना एकामागून एक शरणागती पत्कराव्या लागल्या. त्यातून सावरताना त्यांना प्रशांत किशोर यांनी मदतीचा हात दिला. २०१४ च्या लोकसभेत दणदणीत पराभव झालेल्या नितीशना लालूंच्या दावणीला बांधून मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी प्रशांतने मदत केली होती. म्हणूनच, पुढे त्यांना पक्षात घेऊन नितीश यांनी उपाध्यक्ष केले होतेपदासाठी व अस्थित्वासाठी राजकारण करणाऱ्या नेत्यांची नाळ जनतेपासून तुटत चालली का असा प्रश्न पडलेला दिसत आहे.
नेत्यांची जनतेशी नाळ तुटत चालली का?