रत्न ___ मुंबई : दादर रेल्वे स्टेशनवर एकरेल्वे पोलीस कॉन्स्टेबल देवासारखा मदतीला धावन गेल्यामळे एका २५ वर्षीय यवकाचे प्राण वाचले. अंकितशुक्ला (२५) हा युवक शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर उभा होता. अचानक त्याला भोवळ आली व तो रेल्वे रुळावर पडला. त्याचवेळी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल भाडाळे सहकाऱ्यासमवेत तिथे गस्तीवर होते. त्यांचे लक्ष रुळावर पडलेल्या अंकित शुक्लावर गेले. ते लगेच उडी मारुन रुळावर उतरले. भाडाळे आणि महाराष्ट्र सुरक्षा पथकाच्या दोन जवानांनी अंकितला उचलूनप्लॅटफॉर्मवर आणले. भाडाळे यांनी त्यानंतर अंकितला आपल्या खांद्यावर उचलून घेतले व पादचारी पूलावरुन खाली उतरले.स्टेचर किंवा हमाल येईल याची त्यांनी वाट पाहिली नाही. त्यांनी अंकित शुक्लाला सायन रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून, आता त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी भाडाळे यांच्या समयसूचकतेचे कौतुक केले. भाडाळे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अंकितचे प्राण वाचले. तुम्ही आमच्यासाठी देव आहात असेअंकितचेवडिलभाडाळेंना म्हणाले. मागच्यावर्षी जून महिन्यात दादर रेल्वे स्थानकातील दुसऱ्या एका घटनेत सात रेल्वे पोलीस एका बेशुद्ध प्रवाशाच्या मदतीला धावून गेले होते. ते प्रवाशाला प्लॅटफॉर्मवरुन मेडिकल रुममध्ये घेऊन आले होते
.