मीर-भाईंदर मनपा आरोग्य विभागा मार्फत कोविड 19 चे वैद्यकीय सर्वेक्षण मोहीम सुरू
कोरोना केविड १९ च्या साथीच्या अनुषंगाने मीरा-भाईंदर मनपा च्या माध्यमातून काही गृह संकुलनात वैद्यकीय सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे पत्रक काढण्यात आले आहे. हे सर्वेक्षण सतत १४ दिवस केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मीरा भाईंदर मधील कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून,ज्या परिसरामध्ये कोरोना साथीची लक्षणे दिसून येण्याची संभावना व्यक्त केले जात आहे. त्या परिसरातील रहिवासी संकुलनांतील सर्व घरापर्यंत पोहचुन हे वैद्यकीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे वैद्यकीय सर्वेक्षण सतत १४ दिवसापर्यंत राबवले जाणार आहे. या वैद्यकीय सर्वेक्षणात महानगरपालिकेने निवडलेल्या गृह संकुलनातील, प्रत्येक सदनिकेत मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी , कर्मचारी सदनिकेत जाऊन त्या घरातली आरोग्य विषयक माहिती घेतील . कोरोनाच्या साथीची कोणाला लक्षणे दिसून येत आहेत का हे जाणून घेतले जाईल आणि जर असे लक्षणे दिसून आले तर त्या व्यक्तीला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार केले जातील अशी वैद्यकीय सर्वेक्षण मोहीम काही रहिवाशी संकुलनात सुरू करण्यात येणार असल्याचे पत्रक मीरा-भाईंदर मनपाने काढले आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहत असलेल्या कोणत्याही नागरिकाला कोरोना विषाणू लागणाची सदृश् लक्षणे दिसून येत आहेत का ज्या मध्ये,ताप ,खोकला, सर्दी ,घशात खवखव ,श्वास घेण्यास त्रासअसे काही लक्षणे दिसत आहेत का याचे सर्वेक्षण केले जात आहे. जर कोणत्याही व्यक्तीला अशी काही लक्षणे असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचा माध्यमातून उपचार केले जातील तसेच परदेशातून कोणी घरी आला आहे का, याची माहिती नमूद केली जाईल मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे वैद्यकीय सर्व्हेक्षण वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्या मार्फ़त करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना गृह संकुलनातील, सहकारी गृहनिर्माण संस्थानी सर्व सदनिके मधील सदस्यांनी योग्य ते सहकार्य करावे अशी विनंती मिरा भाइंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.