सर्वसामान्य लोकांचा मुबई लोकलमधून प्रवास होणार बंद

 


सर्वसामान्य लोकांचा मुबई लोकलमधून प्रवास होणार बंद



(पो.म.प.प्रति.मुंबई)  कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी सरकारने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्वसामान्य मुंबईकराची जीवनवाहिनी मुंबई लोकल मधून उद्या सकाळी ६ वाजल्यापासून सामान्य नागरिकांना प्रवास बंद करण्याचा निर्णय सरकार च्या वतीने घेण्यात आला आहे. अशी माहिती  विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.
 
  मुंबईतील लोकलमधून रोज लाखो प्रवास ये जा करतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा सर्वाधिक धोका मुंबईत निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले व लागण झाली आहे हे माहीत असूनही उपचाराच्या , सामाजिक भीती पोटी इतरत्र प्रवास करत आहेत. त्यामुळे फैलाव वेगाने वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने  महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 
मुंबईची जीवनवहिनी सर्वसामान्यासाठी थांबणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेन प्रवासावर उद्यापासून निर्बंध येणार आहेत. लोकलमधून आता सर्वसामान्य लोकांना प्रवास करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांनाच फक्त ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. त्याच बरोबर ज्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. त्यांनाच  प्रवास करता येणार आहे. यासाठी ओळख पत्र दाखवूनच प्रवेश दिला जाईल या साठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात येणार आहे. उद्यापासून ३१ मार्चपर्यंत लोकलवर निर्बंध घालण्यात आले आहे. 


 कोरोनाचा धसका जगाने घेतला आहे. कोरोनाचे संकटाने भारतातही वेगाने पाय पसरायला सुरवात केली आहे. देशातील सर्वात जास्त कोरोनाची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत आणि त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता कठोर निर्णय घेतला आहे. यापूर्वी मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड ही शहरे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद करण्यात आली आहे. उद्या सकाळी ६ वाजल्यापासून सर्वसामान्य मुंबईकरांची  लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे. 


अत्यावश्यक सेवेशी संबंधित नसणाऱ्यांना उद्या रेल्वे स्टेशनवर प्रवेशच मिळणार नाही. सर्वांना शासकीय किंवा अत्यावश्यक सेवेशी संबंधित असल्याचं ओळखपत्र पाहूनच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितले आहे.