नागरिकांना 3 वाजेपर्यंत मनपात येण्यास बंदी

कोरोना विषाणू धोका  व प्रादुर्भाव रोखण्यासाठी मीरा-भाईंदर  महानगर पालिका प्रशासनाने , प्रतिबंधात्मक व सुरक्षिततेच्या दृष्टीने  दुपारच्या 3 वाजेपर्यंत सामान्य नागरिकांना व पत्रकारांना  मनपा कार्यालयात येन्यास बंदी घालण्यात आली आहे.


  कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता  देशावर आलेली राष्ट्रीय आपत्ती  आहे असे मानले गेले आहे. सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सरकारला जमेल त्या पद्धतीने  सरकार कडून काळजी घेतली जात आहे. जनतेने ही सहभाग घ्यावा आणि या कोरोनाच्या साथीला रोखण्यात  सहकार्य करावे असे अवाहन केले आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू केला आहे. खंड २ , ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे . तशी अधिसूचना स्वतंत्ररित्या तयार केली असून ती निर्गमित केली आहे.
याचा आधार घेत मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मनपात कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना व पत्रकारांना  दुपारच्या ३ वाजेपर्यंत येण्यासाठी बंदी घातली आहे. अशी बंदी घालणारी या राज्यातली ही पहिलीच महानगर पालिका असेल असे वाटते आहे असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. 
मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी  सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता खबरदारी म्हणून आणि सर्व सामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी मनपा संदर्भात असलेल्या कामासाठी दुपारच्या ३ नंतरच यावे असे अवाहन केले आहे.