राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश

संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव मोठयप्रमानात होतअसल्यामुळे कोरोनाचे रुग्ण भारतात व महाराष्ट्र मध्ये आढळून येतआहेत . कोरोना फैलाव झपाट्याने होत आहे . वेळीच हा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू केला असून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रशासन यांना राज्य शासनाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.


राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याकाळात मंडळ परिक्षा सुरू राहतील, असे स्पष्ट करताना परिक्षांच्या काळात आजारी विद्यार्थी शाळांमध्ये येणार नाहीत याची खबरदारी पालक आणि शाळांनी घ्यायची आहे असे ही सांगण्यात आले आहे. 


राज्यात पुढील आदेश होईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मीक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.


कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यातील शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर 


मीरा भाईंदर मधील चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायामशाळा ३० मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश देण्यात आले आहेत. 
ठाणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने निर्देश दिले आहेत त्यानुसार महानगरपालिका हद्दीतील सर्व चित्रपटगृहे , जलतरण तलाव , सभागृह , व्यायामशाळा नागरिकांसाठी १४ मार्च ते ३० मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.
 आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पालिका क्षेत्रातील मॅक्सस मॉल, ठाकूर मॉल, रसाज, सिनेमॅक्स येथील सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पालिकेचे स्व. गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स क्लब, जीसीसी क्लब येथील जलतरण तलाव बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता त्याच्यावर प्रती उपाययोजना म्हनुन शहरातील गर्दीची ठिकाणे येथील नागरिकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या ठिकाणांची वारंवार निर्जंतुकीकरण करणे अशा सर्व शहरातील व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.