आर्थिकमंदी व देशात कोरोना साथ या दुहेरी संकटामुळे जर्मनीच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या

आर्थिकमंदी व देशात कोरोना साथ या दुहेरी संकटामुळे जर्मनीच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या


 कोरोनाच्या साथीच्या विळख्यात युरोप सापडला आहे , साध्य युरोप ची परस्थिती नाजूक झालेली आहे, अभूतपूर्व संकटात ओढला गेला आहे. जगातील 30 हजार कोरोनाग्रस्त मृतांमध्ये सर्वाधिक युरोपमध्ये आहेत. कोरोनाची साथीवर नियंत्रण ठेवण्यात अद्यापपर्यंत यश आलेले नाही. इटलीनंतर, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन एका पाठोपाठ एका देशात कोरोनाच्या साथीने हाहाकार माजवला आहे. 


कोरोनाची महामारी सुरू असतांनाच जर्मनीमध्ये एक वाईट घटना घडली आहे.  जर्मनीच्या हेस्सा प्रांताच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्याच केल्याचं वृत्त म्हणजे जर्मनी साठी मोठा धक्का लागला आहे. पहिलेच देशातले आर्थिक संकट आणि कोरोनाची साथ या दुहेरी संकटात देश सापडला असताना, त्या संकटातून सावरायचं कसं? असा प्रश्न असल्यामुळं जर्मनीच्या हेस्सा प्रांताच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्याच केल्याचं स्पष्ट झालंय.



 थॉमस शैफर हे जर्मनीचे अर्थमंत्री होते. त्यांचा मृतदेह एका रेल्वे स्थानकाच्या बाहेर आढळला आहे. शैफर यांच्यासारख्या बड्या नेत्याची या घटनेमुळं कोरोनाच्या चिंतेत असलेला संपूर्ण युरोप खंड हादरला आहे.


आत्महत्याच होती पोलिसांचा दावा


शैफर यांचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला होता. मृतदेह छिन्नविछिन्न झाल्यामुळं त्यांची ओळख पटलेले नव्हती. पण, पोलिस तपासाअंती तो शैफर यांचाच मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. शैफर यांची हत्या झाल्याचा संशयही सुरुवातीला व्यक्त केला होता. परंतु, स्थानिक पोलिसांनी हत्या नव्हे, आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले आहे. शैफर यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी एक पत्र लिहिले आहे. ते पोलिसांच्या हाती लागले असून, त्यावरून त्यांनी आत्महत्याच केल्याचे स्पष्ट झाले आहे. शैफर कोरोनाच्या संकटामुळं चिंतेत होते. त्यांनी गेल्या काही दिवसांत कोरोना व्हायरसच्या काळातील आर्थिक संकटासंदर्भात देशाच्या जनतेला संबोधित केले होते. ते सातत्याने नागरिकांच्या समोर येत होते. सध्या जर्मनीच्या चँसेलर अँजेला मर्केल क्वारंटाइन आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्यामुळं त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.