लाख खंडाळा येथे हत्याकांड करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाधिकाऱ्यां दिले निवेदन.

लाख खंडाळा येथे हत्याकांड करणाऱ्या गावगुंडांना तात्काळ अटक करण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाधिकाऱ्यां दिले निवेदन.


सरकार एकीकडे आंतरजातीय विवाह करणा-यांना सर्वतोपरी मदत करते.तर दुसरीकडे आंतरजातीय विवाह करण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांला आपला जीव गमवावा लागतो. व संपूर्ण कुटुंबाला मृत्यूशी झुंज द्यावी लागते हे दुर्दैवी आहे.


देशभरात जातिभेद निर्मूलन भारतीय घटनेत कायदाने केले असले तरीही प्रत्यक्षातमात्र जातीभेदाची मुळे खोलवर रुजलेली आहेत.हे देशात घडणाऱ्या  जातिभेदाच्या अनेक घटकना साक्षांकित करत आहेत.


मानवतेला सर्मशार करणाऱ्या घटनेने पुन्हां एकदा हे दाखवून दिले की , विज्ञानयुगात वावरतानाहीं मानसिकता बदललेली नाही.
 खैरलाजीं, अहमदनगर मधील खर्डा , सारखाच प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा या गावात घडला. १४/३/२०२० रात्री लाख गावातील काही गावगुंडांनी , शस्रासहीत १० ते १५ जणांनी  कुराडीने मुलाच्या माता पीत्यावर व लहान भावावर खूनी हल्ला केला.  भिमराव बाळासाहेब गायकवाड़ याची हत्या करण्यात आली . तर  मुलाचे वडील बाळासाहेब गायकवाड़ वआईअलका गायकवाड़ हे या हल्ल्यात गभींर जखमी आहेत. ते औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात  मुत्युशी झुजं देत आहेत. या घटनेने लाख ता. वैजापुर जि.औरगांबाद परिसरात मोठी खळबळ ऊडाली आहे . सैराट चित्रपटातल्या कहाणी सारखा हा प्रकार घडवून आणला गेला आहे . आैरगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात तीव्र पडसात ऊमटत आहेत.  बाळासाहेब गायकवाड़ याच्या कुटुबांवर गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र भर निषेध केला जात आहे. 


सवर्ण जातीची मुलगी पळवून नेल्याच्या संशयावरून भिमराज गायकवाड या बौद्ध तरुणाची धार धार शस्त्राने  गळा चिरून हत्या केली गेली आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा खुनी हल्ला केला गेला. हल्ल्यात मयत झालेल्या तरुणाने खुनी हल्ला होण्याची शक्यता असलेले लेखी तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात हल्ला होण्यापूर्वी दिली होती. पण त्याच्या तक्रारीकडे स्थनिक पोलिस अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे. दुर्लक्षित करण्यामागे अधिकाऱ्यांचा जातीयद्वेष असल्याचे सूत्राकडून कळते आहे . जर वेळीच कारवाई केली असती तर तरुणांचे प्राण वाचले असते आणि परिवार ही खुनी हल्ल्याचा बळी ठरला नसता. या कामात निष्काळजी पणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा आणि मृतकांच्या घरच्यांना २५ लाख रुपयांची मदत व कुटुंबतील एका व्यक्तीला सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी करत  अरोपीला तातडीने पकडुन त्यांना फाशीची शिक्षा कसी होईल याकडे लक्ष देऊन तपास करावा असे असी मागणी २० मार्च रोजी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे व परभणी जिल्हा प्रमुख राजकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा केली व जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण संदर्भात चर्चा करून,जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात ही विनंती करण्यात आली आहे.
यावेळी प्रशांत तळेगावकर, अमर फुलारी, अनिल नरवाडे सुबोध काकडे, दीपक ठेंगे, मारोतराव ढाले, नामदेव कनकुटे, अनिल नरवाडे, अभिनय भारत  तसेच महिला आघाडीच्या पंचशिला वाघमारे शोभाबाई डोंगरे ,उषाताई साळवे ,वैशालीताई गायकवाड, रागिनी ताई वाघमारे, संघमित्रा जोंधळे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.