सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो कुठला? नेमकं सत्य काय जाणून घ्या 

 


 


 


सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो कुठला नेमकं सत्य काय जाणून घ्या 


जगभर पसरलेल्या महामारीचा फटका अनेक देशांना मोठ्याप्रमानात बसला आहे. कोरोना विषाणूच्या विळख्यात चीन,स्पेन,इटली अडकली त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लागण आणि मृत्यू झालेल्यांची संख्या इटलीत मोठया प्रमाणात आहे. हे जरी खरे असले तरीही एक खोटा मॅसेज समाजमाध्यमातून फिरत आहे.  एक फोटो आहे त्यात इटलीमधील रस्त्यावर शेकडो मृतदेह पडल्याचे छायाचित्र आहे असे सांगितले जात आहे.सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज कोणतीही पडताळणी न करता पुढे पाठवण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या छायाचित्राचा  संबंध आहे का?


सोशल मीडियावर इटलीमधील भीषण परिस्थिती दर्शवणारे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
अशा प्रकारचे एक छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहे. या छायाचित्रात मोठ्या संख्येने लोकांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत असून, हे छायाचित्र इटलीमधील असल्याचा दावा केला जात आहे.


पण, या छायाचित्राचा आणि कोरोना साथीचा काहीही संबंध नाही.
 हे छायाचित्र जर्मनीमधील फ्रँकफर्ट येथील आहे. २४ मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेला हा फोटो एका आर्ट प्रोजेक्टचा भाग होता. नाझींच्या छळछावणीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक अशा पद्दतीने रस्त्यावर झोपले होते. 
१९४५ रोजी हिटलरने नाझी कॅम्पमध्ये ५२८ ज्यू नागरिकांना ठार केले होते. त्या सर्वांचे मृतदेह फ्रँकफर्ट येथील केंद्रीय दफनभूमीत दफन करण्यात आले होते. या सर्व पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २४ मार्च २०१४ मध्ये आर्ट प्रोजेक्ट आयोजित करण्यात आला होता. त्यावेळचे हे छायाचित्र इटली आहे असे सांगून सोशल मीडियावर मोठ्याप्रमानात प्रसार होतांना दिसत आहे . 


करोना साथीचा फटका सर्वात जास्त  बसलेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश आहे. इटलीत एकाच दिवसात हजारो लोकांच्या मृत्यूची नोंद होत आहे. हे जरी वास्तव असले तरीही समाजमाध्यमावर फिरणारा फोटो मात्र इटलीचा नाही हे सत्य आहे .