मिरारोड नयानगर परिसरात 5 जणांना कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी केले दाखल

 


 


 


मिरारोड नयानगर परिसरात 5 जणांना कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी केले दाखल


ठळक मुद्दे


(१)समाज माध्यमातून कोरोना बाधित भेटल्याची वाऱ्यासारखी पसरली अफवा.


(२) सदर व्यक्ती हा अनेक आजारांनी त्रस्त.


(३) खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखवले कोरोना बाधित असल्याची लक्षणे.


(४)या व्यक्तीसह घराच्या चार जणांची केली कोरोना विषाणू लागण झाल्याची तपासणी.


(५)पाच जणांना कस्तुरबा रुग्णालयात केले दाखल.


मिरा-भाईंदर महानगर पालिकेच्या क्षेत्रात मिरारोड पूर्व नया नगर मध्ये राहत असलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीच्यासह पाच जणांचे कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तपासणी करण्यात येत आहेअसे मीरा-भाईंदर मनापा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले आहे.
मिरा-भाईंदरशहरातकोरोनाचा रुग्ण आढळला अशी अफवा संपूर्ण शहरात समाज माध्यमातून  (शोशल मीडिया)वाऱ्यासारखी पसरत होती त्यामुळे शहरात चिंतेने आणि भीतीने एकच खळबळ उडवून दिली होती.


मीरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याची अफवा शहरात पसरवली जात होती, तो वेक्ती गेल्या काही काळापासून कर्करोग आणि मधुमेहामुळे त्रस्त होता. आठ दिवसांपूर्वी त्याला निमोनियाचा आजार झाल्यामुळे त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वेगवेगळ्या आजारामुळे पीडित असल्याने त्याचे नमुने खाजगी रुगणालाया कडून तपासण्यात आले तेव्हा खाजगी रुग्णालयात  कोरोनाची लक्षणं असल्याचे सांगितले गेले त्यामुळे महानगर पालिकेने कोणतीही जोखीम घ्यायला नको म्हणून आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी त्या व्यक्तीला आणि घरच्या चार सदस्यानां कोरोना विषाणू ची लागण आहे की नाही याची तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचा तपासणी अहवाल आलेला नाही आज येण्याची शक्यता आहे. मनापा प्रशासन यामुळे खडबडून जागे झाले आहे. आयुक्तांनी कोणतही जोखीम,धोका पत्करायला नको म्हणून खबरदारी घेत संपूर्ण इमारत जंतुनाशक औषधांने साफ करून घेतली, त्याच बरोबर हा परिसर पूर्णपणे लॉकडाउन केला, आला हजरत मैदानावर लावलेली भाजीपाला दुकाने ही बंद करण्यात आली आहेत.त्याच बरोबर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे परिसर सीलबंद करण्यात आला आहे जेणे करून  कोणीही व्यक्ती बाहेर येणार नाही याची काळजी घेण्यात आली. उपाययोजना च्या दृष्टीने जे जे करणे शक्य आहे ते करण्यात आले आहे.  शक्य आहे तेवढी काळजी घेतली आहे. शहरातील नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे पाऊल उचलता येईल ते उचलले आहे. 


या व्यक्तीने परदेशात प्रवास वगैरे काही केलेला नाही . हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी पुण्याला देखील जाऊन आल्याचे पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले आहे.


आतापर्यंत मिरा भाईंदरमध्ये 620 नागरिक हे परदेशातून आले असून यापैकी 393 नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर 227 नागरिकांना 14 दिवसांच्या तपासणी नंतर घरी सोडण्यात आले आहे. त्याचप्रकारे 357 नागरिकांचे घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. दररोज या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.