मुंबई : कोरोनाच्या वाढता फैलाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी होणारा इयत्ता दहावीचा पेपर २३ पुढे ढकलण्यात आला आहे अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षा वेळापत्रका नुसार २३मार्च रोजी पेपर होता. पण कोरोना च्या वाढत्या प्रभावामुळे हा पेपर पुढे ढकलण्यात आला असून पेपर कधी घेण्यात येणार याची तारीख ३१ मार्च रोजी किंवा नंतर जाहीर करण्यात येईल असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
या पूर्वीच करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र आता दहावीचा २३ मार्च रोजी होणारा पेपरही रद्द करण्यात आला आहे. यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
दहावीचा सोमवारी शेवटचा पेपर राहिला होता. जो २३ मार्च रोजी होणार होता. मात्र करोना बाधित रुग्णांची दिवसंदिवस वाढत असल्याने . सगळे जण चिंतेत आहेत . सावधानता बाळगणे हाच एकमेव पर्याय असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
इतके दिवस सरकारकडून सांगण्यात येत होते की, दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये बदल होणार नाहीत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सरकारने निर्णय घेतला की, परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा लागेल . कोरोनाची वाढती परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये , राज्यातील प्राप्त परिस्थिती लक्षात हा निर्णय घेतला गेला आहे. कोणीही कामा व्यतिरिक्त घरा बाहेर पडू नये, हे सरकार तर्फे वारंवार सांगण्यात येत आहे.काळजी घ्या आणि परिस्थितीचा सामना करा व देशावर आलेले कोरोनाचे संकट हाणून पाडा असं सांगण्यात आलं येतं आहे . शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा पेपर पुढे ढकलन्याचा निर्णय घेतल्या मुळे पालकांत वाढलेली चिंता सध्यातरी दूर झालेली आहे. नवीन तारखेची घोषणा ही ३१ मार्चनंतर केली जाईल असे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्रीवर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.