मीरा-भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह मनपा क्षेत्रातील काही भागाचा दौरा केला . रखडलेल्या नालांच्या कामाची पाहणी केली. पावसाळ्यात जलमय होणाऱ्या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले, आवश्यक गटारे यांचे काम सुरू करून ते पुर्ण कण्याचे निर्देश दिले आहेत.
मीरा-भाईंदर शहराला पावसाळ्यातील दिवस हे पूर्ण जलमय करून टाकत असतात शहरातील नैसर्गिक नाले , खदाणी, तलाव भूमाफियांनी स्थानिक नेत्यांच्या आशीर्वादाने मातीभराव करून गिंळकृत केले आहेत . याला जेवढे मनपा , महसूल विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत तेवढेच स्थानिक नगरसेवक ही जबाबदार आहेत. त्याच बरोबर मनपा कडून होणारी थातुरमातुर नाले सफाई यामुळे शहर जलमय होणार यात शंका नसते. तीन महिन्यावर येऊन ठेपलेला पावसाळा पाहता या शहराला या अपत्ती पासून सुटका करावयाची असेल तर पाणी निचरा करण्यासाठी नाले व्यवस्थीत असणे गरजेचे आहे. शहरात नाले बनवण्याची प्रक्रिया हवी तेवढी तेज गतीने होतांना दिसत नाही. नुकतीच आयुक्त महोदयांनी एम एम आरडीए च्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या नमस्कार पेट्रोल पंप ते संगणा देवी मंदिर पर्यंत बायपास नाला हा पुढे घोडबंदर खाडीला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे या कामाला भेट दिली .
पावसाळ्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पावसाचे पाणी नाल्या मार्गे मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मिरागाव, मुंशी कंपाऊंड, जनता नगर, काशिगाव, सिल्वर सरिता, लक्ष्मी बाग या भागातून पुढे घोडबंदर खाडीत मिळतो. सदर पाणी शहरातील भागातून जात असल्याने नाले हे भरून पाणी परिसरात पसरून सदर भाग जलमय होतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक शून्य आठ समांतर नमस्कार पेट्रोल पंप ते संगणा देवी मंदिर पर्यंत बायपास नाल्याचे काम सुरू असून सदर नाला पुढे घोडबंदर जेसल पार्क यासाठ मीटर रस्त्यावर लगत बांधण्यात येत असलेल्या नाल्यास मिळून सदर नाला घोडबंदर खाडी जोडण्याचा प्रकल्प सुरू असून सदर नाला बांधकाम व कॉंक्रीट रस्ता एम एम आर डी ए मार्फत बांधण्यात येत आहे. सदर कामात अडथळे असून सदर कामाची श्री चंद्रकांत डांगे, आयुक्त यांनी शनिवारी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. सदर नाल्यात अडथळा निर्माण करणारी ट्रान्झिट कॅम्प त्वरित स्थलांतरित करण्याचे आयुक्त यांनी आदेश दिले. तसेच जागामालकामुळे नाल्याची थांबलेली कामे जागा मालकांशी चर्चा करून त्यांना मोबदला देऊन त्वरित सुरू करून मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
सदर कामासोबत आयुक्त यांनी ट्रक टर्मिनल, उद्यानांच्या जागेतील संक्रमण शिबिरे स्थलांतरित करून सदर आरक्षणाच्या जागेत ट्रक टर्मिनल व उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. घोडबंदररस्त्या लगत उभारण्यात आलेल्या बस डेपोला भेट देऊन कामाचा आढावा घेतला .
याचबरोबर मीरा रोड शीतल नगर भागाची पाहणी केली .स्थानिक नगरसेवक श्री राजीव मेहरा, श्रीमती मार्लिन डीसा यांवेळी उपस्थित होते. या परिसरातील सुरु असलेली नाल्यांची कामे तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक लागणारी गटारे, नाले यांचे बांधकाम सुरू करून मे अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यासोबत शीतल नगर भागातील आर. जी. भूखंडाची पाहणी करून विकासात श्री कांती हरिया यांना सदर आर. जी. जागा विकसित करण्याचे आदेश दिले.
सदर पहाणी दौऱ्यावेळी आयुक्त
समवेत मनपा अधिकारी ,डॉ. सुनील लहाने अतिरिक्त आयुक्त, शिवाजी बारकुंड शहर अभियंता, दिपक खांबित कार्यकारी अभियंता, सुरेश वाकडे कार्यकारी अभियंता समवेत प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे, नरेंद्र चव्हाण, बांधकाम, पाणीपुरवठा व नगर रचना, परिवहन विभागातील अभियंते, कर्मचारी उपस्थित होते.