लॉकडाऊनच्या धर्तीवर मीरा भाईंदर मधील संकुलनांनी घेतली  स्वतःची काळजी घेण्याची भूमिका

 


 


लॉकडाऊनच्या धर्तीवर मीरा भाईंदर मधील संकुलनांनी घेतली  स्वतःची काळजी घेण्याची भूमिका



           कोरोना व्हायरसच्या बचावासाठी आता प्रशासनाबरोबर मीरा भाईंदर मधील रहिवाशी संकुले पुढे आले आहेत. शहरातील  काही संकुलनांनी आपापल्या संकुलनांनी मुख्य प्रवेशद्वाराला टाळे मारून सुरू असलेल्या लॉकडाउनला  संकुलनांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.   लॉकडाऊनच्या काळात नागरिक संकुलनाच्या बाहेर विनाकारण रस्त्यावर जाऊन गर्दी करतात त्याला आळा घालणे आपले कर्तव्य असल्याचे समजून काही संकुलनांनी कोणीही सदस्य इमारतीच्या जाऊ नये  याची खबरदारी घेतली संकुलनांनी घेतली आहे. अत्यावश्यक सेवे करताच सदस्यांनी बाहेर पडावे, बाहेरील भाजी,पेपर,फळ, हारवाला ,इस्त्रीवाला  यांना संकुलात प्रतिबंध करण्यात आला आहे .१० दिवस  संकुलनाच्या  आवारात खेळण्यासाठी बंदी घातली आहे.स्वछतेकडे लक्ष देण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात आहेत. संकुलनांच्या  प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या (सेनिटाइजरने) जंतुनाशक द्रव्यांने हात धुवूनच बाहेर गेलेल्या सदस्यांना  संकुलनात प्रवेश देण्यात येत आहे. बाहेरुन येणाऱ्या पाहुण्याकरता सोसायटी मध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संकुलनांनी बाहेरिल व्यक्तिची वाहने देखील प्रवेश द्वारा बाहेरच ऊभी कले जात आहेत.