मीरा-भाईंदर शहरावरील संकटाचा सामना करण्यासाठी महापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

मीरा-भाईंदर शहरावरील संकटाचा सामना करण्यासाठी महापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठकमीरा-भाईंदर शहरावरील संकटाचा सामना करण्यासाठी महापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक



कोरोना रोगाच्या साथीच्या आजाराबाबत उपाययोजनांसाठी मीरा-भाईंदर महानगरपालिके मध्ये महापौरांनी बैठक घेतली. शहरातील किराणा दुकानात, भाजीपालामंडईत होणारी गर्दी पाहता. आणि शहरातील नाका कामगार,मजूर, रस्त्यावर राहणारे लोक यांच्या साठी काय उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी चर्चा केली. शहरात कोणीही उपाशी पोटी राहू नये याची काळजी घेतली जातआहे.  सगळयांना सेवा देण्यात महानगर पालिका सज्ज झाली आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागसमितीत प्रत्येक वॉर्डात ‍निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे.
 तसेच गोल्डन नेस्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स च्या समोर या ‍ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन केलेआहे. आणखी गरज भासली तर पर्याय उपलब्ध केले जातील. मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना करीत आहेत याची माहिती महापौर जोस्तना हसनाळे यांच्या दालनात आज झालेल्या आढावा बैठकीत चर्चा केली असल्याचे महापौरांनी सांगितले.


            कोविड 19 संदर्भात मीरा-भाईंदर महानगर पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा आज महापौर जोस्तना हसनाळे यांनी घेतला. यावेळी बैठकीस उपमहापौर, स्थायी समिती सभापती,सभागृह नेते, विरोधी पक्षनेते ,गटनेते तसेच नगरसेवक,आयुक्त, डिवायएसपी, मनपातील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी महापालिका आयुक्त यांनी प्रशासनाने तयार केलेल्या कृती आराखड्याची माहिती दिली. कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या संस्था, एनजीओ, मंडळे यांचे सहकार्य घेऊ. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मदतीने त्या परिसरातील अडचणी सोडवण्यात येतील. तसेच संपूर्ण शहरात नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबतची जनजागृती करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार असून सर्व परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानदारांना ग्राहकातील एकमेकांचे सुरक्षित अंतर  ठेवण्याबाबतच्या सूचना देण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेतील आरोग्य ‍विभागाकडून दैनंदिन वेगवेगळ्या विभागात फवारणी  केली  जात आहे. तसेच शहरात स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले असून सद्यस्थितीत मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीतआहे असे महापौरांनी सांगितले आहे.