लोकप्रतिनिधीं कोरोनाच्या धास्तीने , फिरकलेच नाहीत,नागरिकांमधून होत आहेत आरोप
कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण देश हादरला आहे तर सरकारी यंत्रणेने नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र सरकारने २१ दिवस संचारबंदी घोषित केली,या संकटमय काळात प्रभागातील नागरिकांचा कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मनपा मार्फत मोफत जंतुनाशक औषधाची फवारणी केली जात आहे. तर स्थानिक लोकप्रतिनिधीसाधे फिरकत आले नसल्यामुळे प्रभागातील नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मीरा-भाईंदर महानगर पालिका प्रभाग क्रमांक १८ मधील स्थानिक लोकप्रतिनिधी प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी येतांना दिसत नाहीत. त्याचबरोबर कोरोना साथीच्या भीतीने हवालदिल झालेल्या प्रभागातील जनतेला दिलासा, धर्य, सूचना देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी फिरकले नसल्याने लोकांनी आपली नाराजगी चा सूर उमटतांना दिसत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रभागांमध्ये महापौर व प्रभागाचे नगरसेवक स्वतः जातीने उपस्थित राहून रस्ते, गल्ल्या अग्निशमन दलाच्या मदतीने जंतुनाशक औषधाची फवारणी करू लागले आहेत. मिरा गावठाण ,चेकनाका ते काशीमीरा डोंगरी, साईकृपा कॉप्लेक्स, मनाली कॉम्प्लेक्स, ग्रीनविलेज,वेस्टर्न पार्क, मिनाक्षी नगर ,मांडवीपाडा, गगनगिरी, माशाचापाडा, डाचकूलपाडा, चेना गोल्डन नेस्ट, पेणकरपाड़ा आदी ठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे. प्रभाग १४ या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळीची वस्ती आहे. शहरातील अनेक वस्त्यामध्ये नगरसेवक पुढाकार घेऊन जंतुनाशक औषधांची फवारणी करून घेताना दिसत आहेत. लोकांचे आरोग्य निरोगी रहावे या करता फवारणी करण्यात येत असल्याचे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी सांगितले मात्र प्रभाग १८ च्या लोकप्रतिनिधीना कोरोनाची भीती तर वाटत नाही हा प्रश्न प्रभागातील नागरिक विचारत आहेत. काहीजनाणी तर चक्क आरोप करतांना म्हटले की, कोरोनाची धसका लोकप्रतिनिधीनीच जास्त घेतल्यामुळे प्रभागात फिरकत नाहीत असा आरोप केला जात आहे.
प्रतिक्रिया :
जेव्हा पासून संचार बंदी लागू झाली आहे तेव्हापासून चारही नगरसेवक परिसरात विचार पूस करण्यास फिरकले नाहीत इतकेच नाही तर परिसरात काही जणांनी तर नगरसेवक आहेत किवा नाहीत, असा प्रश्न पडू लागला आहे.
सुमित पाटणकर ( रहिवासी )