शहरात कोरोनाचा सामना करण्यासाठी गृहसंकुलने तयार
कोरोना विषाणू पासून नागरिकांच्या बचावासाठी प्रशासनाणे खबरदारी घेत वेगवेगळ्या आदेशानुसार शहरातले हॉटेल ,शाळा, बार, गार्डन , खेळाची मैदाने, विरंगुळा केंद्रे, अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त असलेली दुकाने बंद करण्याची भूमिका घेत नागरिकांत जागरूकता निर्माण केली आहे. या सावधगिरी च्या मोहिमेत शहरातील विविध गृहसंकुलंने यांनी ही खबरदारी म्हणून एक पुढचे पाऊल उचलले आहे.
वाढता कोरोनाच्या साथीचा प्रभाव रोखता यावा म्हणून मीरा भाईंदर मधील सर्व सामान्य नागरिकही पुढे सरसावले आहेत. काही गृहसंकुलांनी एक आगळी वेगळी पद्धत्त सुरु केली आहे. कोणीही इमारतीच्या बाहेर गरज नसल्यास पडायचे नाही. बाहेरील विक्रेत्यांना संकुलात प्रतिबंध करण्यात आला आहे .
कोरोनाच्यासाठी मिरारोड मधील देवतारा सोसायटीसह अनेक सोसायटीनी वसाहतीतील राहणाऱ्यासाठी नियम लागू केले आहेत. येथील ५ ते १५ वर्ष वयोगटाच्या मुलाना पालकानी किमान १० दिवस गृहसंकुलंनातील आवारात लहान मुलांना खेेळण्यास बंदी घातली आहे. तसेच घरातील कचरा कोणीही बाहेर टाकणार नाही,स्वछतेकडे लक्ष देण्यासाठी स्वतःच्या घरी कोणतेही फर्नीचर, प्लास्टर आदि कामे करणार नाहीत, असे नियम लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बाहेरुन आल्यावर खाली गेटजवळ ठेवलेल्या सेनिटाइजरने हात धुवूनच सर्वांना प्रवेश दिला जात आहे. संसर्ग टाळण्यासाठी प्रवेश द्वाराजवळील थम्ब मशीन बंद करण्यात आले आहे. तर लोखंडी दरवाजाला हात लागतील म्हणून त्याना पकडण्याकरिता पेपर लावले गेले आहेत. लहान मुलांना रस्त्यावरून जाताना किंवा गर्दीच्या ठिकाणी कुणी भेटल्यास त्यांच्याशी एक मीटर दुरूनच संवाद साधून, हात न मिळवताच समोरच्याला नमस्कार करण्यात यावा, जेणेकरून दुसऱ्याच्या हातातील जंतूंचा संसर्ग आपल्याला होणार नाही, अशा सूचना गृहसंकुलं वसाहतीत राहणाऱ्या लोकांच्या घरोघरी जाऊन देण्यात आल्या आहेत. हा प्रयोग लवकरच अन्य संकुलने सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे.