बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह युवक अडकला पोलिसाच्या सापळ्यात
.खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार कोथमिरे यांना गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची बातमी मिळाली त्याच माहितीच्या आधारे सापळा लावण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार कोथमिरे गुप्तबातमीदाराने दिलेली माहिती घेऊन वरिष्ठांना सदर माहिती दिली आणि वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे ठाण्यात १९/०३/२०२० रोजी सापळा लावण्यात आला. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पो.नि.संजय शिंदे यांचे नेतृत्वाखाली पोउपनिरी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दादोजी कोंडदेव स्टेडीयम जवळ, खारटन रोड, नागसेननगर, ठाणे येथील रोडवर सापळा रचण्यात आला. २०:०५ वा.चे सुमारास इसम नामे गौतम दशरथ तांगडी वय ४२ वर्षे रा. पै गाव, शंकर मंदीराजवळ, ता.भिवंडी जि.ठाणे याचे ताब्यातुन ०१ बंदुक अग्निशस्त्र व ८ जिवंत काडतुसांसह मिळुन आला आहे. सदरची बंदुक व काडतुसे ही बेकायदेशीरित्या विनापरवाना बाळगलेले असल्याने ताब्यात घेतलेला इसम गौतम तांगडी याचे विरूध्द पो.ना. हेमंत महाले यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९७/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५१-ब),(अ) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. मिळुन आलेला शस्त्रसाठा आरोपीने कोणाकडुन घेतला व ठाणे शहरात कोणाला विक्री करण्यासाठी आला होता त्या बाबत वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा अधिक तपास करीत असुन आरोपी याची दि.२३/०३/२०२० रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. सुरेश कुमार मेकला, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. प्रविण पवार, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. दिपक देवराज, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. एन.टी. कदम, गुन्हे शाखा ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजकुमार कोथमिरे, पोनि. संजय शिंदे, पोनि. विकास घोडके, सपोनि. पोपट नाळे, सपोनि. जे. डी. मुलगीर, पोउनि. रमेश कदम, पोउनि. एम. टी. कळमकर, सपोउनि. संजय भिवणकर, पोहवा. सत्यवान सोनावणे, सुरेश मोरे, अंकुश भोसले, कल्याण ढोकणे, बजरंग गोसावी, सुरेश यादव, सुभाष तावडे, पोना. नितीन ओवळेकर, प्रशांत भुर्के, चंद्रकांत ठाकरे, रूपेश नरे, हेमंत महाले, महेश साबळे, किशोर कांबळे, रोशन जाधव, उमेश जाधव, समीर लाटे, बाळु मुकणे, मपोना. प्रेरणा जगताप यांनी शिताफीने पार पाडत आरोपीला गजाआड केले आहे.