भाईंदर शहरात वाढलेले अवैध फेरीवाले आणि शहरातील फुटपाथ कब्जा करून स्थानिक जनतेला वेठीस धरणाऱ्या अवैध फेरीवाल्यांच्या त्रासाला कंटाळून मीरा भाईंदर रेडिमेड अँड क्लॉथ मर्चंट वेल्फेअर असोसिएशन या कपडा व्यापारी संघटना कडून प्रशासनाच्या विरोधात धरने आंदोलन सुरू .
मिराभाईंदर शहरात राजकारण्यांच्या आशीर्वादात आपले बस्तान बसवलेल्या अवैध फेरीवाल्यांचे वाढलेले प्रस्त पाहता शहरातला एकही फुटपाथ रिकामा राहतो की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. शहरात अवैध फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे फेरिवाल्यांना स्थानिक नगरसेवकांचे संरक्षण मिळत असल्यामुळे हप्ताखोरी सुरू असल्यामुळे फेरीवाले बिनधास्त असतात असे आरोप लावले जात आहेत .
महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाची गाडी फेरीवाले हटवण्यासाठी येण्यापूर्वीच फेरीवाल्यांना माहिती मिळालेली असते. त्यामुळे त्या वेळेत कोणताही फेरीवाला आपले दुकान लावत नाही . या फेरीवाल्यांना पाठीशी घलण्यामागे मनपातील काही अधिकारी वर्ग ही सामील आहे . शासनातील अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळी यांच्या संगनमताने अवैध फेरीवाले बसवले जातात. अवैध फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी फेरीवाल्यांकडून पैसे घेतले जातात जसी मोक्याची जागा तसे पैसे द्यावे लागतात अशी माहिती ही फेरीवाल्यांच्या गोटातून ऐकायला मिळते आहे. शहरातील अनेक नागरिकानीं या अवैध फेरीवाल्यांच्या तक्रारी देऊन ही ठोस कारवाई होत नाही . शहरातील कपडा व्यापारी संघटने कडून अनेक वेळा आयुक्त, महापौर, आमदार स्थानिक प्रशासन यांना निवेदन,तक्रारी देऊन कडक कारवाई केली जात नाही . यामुळे व्यापारी वर्गाच्या व्यावसायावर या अवैध फेरीवाल्यांचा परिणाम होत आहे. अवैध फेरीवाल्यांवर थातुरमातुर कारवाई केली जाते . राजकारण्यांनि फोन केला की लगेच उचललेली अवैध फेरीवाल्यांचे समान परत केले जाते. त्यामुळे फेरीवाल्यांना भीती वाटत नाही . मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे अवैध फेरीवाल्यांच्या संख्येत मोठयाप्रमानात वाढ होत आहे . या फेरीवाल्यांकडून स्थानिक स्थानिक व्यपारी वर्ग स्थानिक रहिवाशी खरेदीसाठी येणार वर्ग , कामानिमित्त ये जा करणारा वर्ग त्रासाला आहे . फूटपाथ बरोबरच रस्ते ही कब्जा केलेलें शहरात दिसतील . रुग्णवाहिका नेण्यासाठी कसरत करावी लागते. रस्त्यांच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
ना फेरीवाल्यां क्षेत्रातून केली जाते बाजार वसुली :
ना फेरीवाला क्षेत्रात ही फेरीवाल्यांना मनपाच्या बाजार वसुली ठेकेदारांकडून बसवून त्यांच्या कडून पावती देऊन वसुली केली जाते . अवैध फेरीवाल्यांचा त्रास संपूर्ण शहरवाशींना होतांना दिसत आहे. याची जाणीव लक्षात घेऊन मीरा भाईंदर मधील कपडा व्यापारी वर्गाने आपले दुकाने बंद ठेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे. तक्रारी करूनही काही कारवाई होत नाही त्यामुळे अखेर व्यापाऱ्यांनी लोकशाही मार्गाने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या गंभीर होत चाललेल्या समस्येवर मनपाचे आयुक्त चंद्रकांत डांगे काय भूमिका घेऊन कोणता निर्णय घेतात आणि मनपा प्रशासन किती जागरूक होऊन काम करेल हे भविष्यात कळेल.य